हादगाव हिमायतनगर मतदार संघ डिजिटल सदस्य मोहिमेत नंबर बनला असावा - खा.तुकाराम रेंगे -NNL


हिमायतनगर|
नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या विकासाभिमूक नेतृत्वामुळे हदगाव हिमायतनगर मध्ये काँग्रेसचा चाहता वर्ग अधिक आहे. असे असले तरी काँग्रेसच्या सर्वच छोट्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून हादगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघ डिजिटल सदस्य मोहिमेत जिल्ह्यात एक नंबरला ठेवण्याचे काम करावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांनी केले.

ते हिमायतनगर येथील महात्मा फुले सभागृहात आयोजित डिजिटल सदस्य नोंदणी आढावा बैठक  प्रसंगी बोलत होते. यावेळी तालुक्यातील व शहरातील सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमी यांना डिजिटल सदस्य नोंदणी संदर्भात केलेल्या कामच आढावा त्यांनी घेतला. तसेच शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेल्या नोंदणीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. 

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर, शहराध्यक्ष संजय माने, नाजीमचे संचालक गणेशराव शिंदे, माजी तालुकाध्यक्ष जनार्धन ताडेवाड, माजी जी.प.सदस्य सुभाष राठोड, माजी संचालक रफिक सेठ, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, शिवाजीराव पाटील सिरपल्लीकर, प्रवीण कोमावार,  हमीद सर, कानबा पोपलवार, शेख मुखींड खडकीकर, फेरोज कुरेशी, पंडित ढोणे, आदींसह अनेक मान्यवरांची व काँग्रेस, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी