डॉ. शंकरराव चव्हाण अभ्यासिका संकुलामुळे विद्यापीठाच्या वैभवात भर -NNL


नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरामध्ये दि. २८ फेब्रुवारी रोजी तीन वास्तूंचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकरावजी चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नाउदयजी सामंत, आअमरनाथ राजूरकर, आमोहनराव हंबर्डे, आ. बालाजीराव कल्याणकर,  माजी  पालकमंत्री डी. पी. सावंत, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

विद्यापीठाच्या परिसरामध्ये डॉ. शंकरराव चव्हाण अभ्यासिका संकुलाची जवळपास २५ कोटी रुपयांची भव्य-दिव्य अत्याधुनिक अशी अभ्यासिका तयार होणार आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण अभ्यासक्रम इंटरनेटसह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भव्य असे ग्रंथालय, नामांकित व्याख्याते, अत्याधुनिक संगणक तथा तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. 


यामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी भविष्यात स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी ठरतील आणि त्याच बरोबर या संकुलामुळे विद्यापीठाच्या वैभवात भर पडणार आहे. याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या  विद्यार्थिनींना याच परिसरामध्ये निवास व्यवस्थाही उपलब्ध होणार आहे. त्यासाठी जवळपास  कोटी रुपयाचे शंभर प्रवेश क्षमता असलेले मुलींचे वस्तीगृह इमारतीचे भूमिपूजनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय या परिसरामध्ये जवळपास १३ कोटी रुपयांचे शासकीय अध्यापक महाविद्यालयीन इमारतीचे भूमिपूजनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


या भूमिपूजनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर जयश्रीताई पावडे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. वैजंता पाटील, डॉ. महेश मगर, डॉ. दिपक बच्चेवार, डॉ. अशोक टिपरसे आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी