उस्माननगर येथील ईस्माईल फकीर यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मंजूर-NNL


उस्माननगर,माणिक भिसे|
येथील इस्माईल नाबूशशहा फकीर यांच्या वैद्यकीय उपचारासाठी माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.अशोकराव चव्हाण व माजी सभापती तथा काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बालाजी पांडागळे यांच्या प्रयत्नातून उस्माननगर येथे पहील्यादाच वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहय्याता निधी मधुन 50 हजाराचे अर्थसहाय्य मंजूर  झाले आहे.

उस्माननगर  ता.कंधार येथील इस्माईल नाबूशशहा फकीर हे अनेक दिवसापासून मेंदू रोग आजाराने त्रस्त होते.घरची परिस्थितीत हलाखीची, दवाखान्यात लागणारा  खर्च न परवडणारी परिस्थिती यामुळे फकीर कुटूंब हताश होऊन बसलेले पाहून गावातील सामाजिक कार्यकर्ते, मित्र पुढे येवून  नांदेड येथील डॉ.रूतुराज जाधव यशोसाई हाॅस्पीटल ,नार्गाजुन पब्लिक स्कूलासमोर कौठा नांदेड येथे दाखल केले होते.येथे खर्च लाखो रुपये येत होता.

ईस्माईल फकीर यांच्या मेंदू रोग या रोगावर होणार खर्च भागविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ५००००. रू.(पन्नास हजार रुपये) चे अर्थसहाय्य मंजूर केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.अशोकराव चव्हाण व माजी सभापती तथा काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे यांच्या प्रयत्नातून उस्माननगर येथे पहील्यादाच  वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केल्याबद्दल येथील सामाजिक कार्यकर्ते अमिनशा फकीर, व्यंकटराव सोनटक्के,करिम पठाण, अशोक काळम, संभाजी पाटील काळम,संजय भिसे, यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी