‘स्वारातीम’ विद्यापीठातील दोन कर्मचारी सेवानिवृत्त -NNL


नांदेड|
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वरिष्ठ लिपिक दिपक पोतदार आणि सफाई कामगार मूर्तीबाई भुमक दि. ३१ मार्च रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत. यानिमित्त विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये दि. ३१ मार्च रोजी निरोप समारंभानिमित्त सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी दोन्ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सहकुटुंब सत्कार केला. 

यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुंडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे यांची उपस्थिती होती. दिपक पोतदार १९९६ ला विद्यापीठामध्ये सेवक या पदावर रुजू झाले होते. पुढे पदोन्नतीने ते वरिष्ठ लिपिक या पदापर्यंत पोहोचले. त्यांनी एकूण २६ वर्षे सेवा विद्यापीठाला दिली. या काळात त्यांनी परीक्षा,  शैक्षणिक, पदव्युत्तर विभाग व संगणकशास्त्र संकुल इ. विभागात सेवा दिलेली आहे.  

श्रीमती मूर्तीबाई या १९८६ पासून सफाई कामगार पदावर काम करीत होत्या. त्यांनी जवळपास २६ वर्षे या विद्यापीठाला आपली सेवा दिली. त्यांनी आपल्या कार्यकाळात मा. कुलगुरू कार्यालय, कुलसचिव कार्यालय, संपदा विभाग, मुलींचे वस्तीग्रह, ज्ञानस्त्रोत केंद्र इ. ठिकाणी सेवा दिली. विशेष म्हणजे श्रीमती भुमक या विद्यापीठात कायम होण्यापूर्वी त्यावेळीच्या मराठवाडा विद्यापीठाच्या आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथील उपकेंद्रांमध्ये १९७६ पासून कार्यरत होत्या. त्यावेळी त्यांना वीस रुपये प्रतिमहा एकत्रित वेतन होते. पुढे १९९५ पर्यंत एक हजार दोनशे रुपये प्रतिमहा इतके झालेले होते. त्यानंतर १९९६ मध्ये त्या ‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या कर्मचारी म्हणून सेवा देत होत्या. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. वैजनाथ अनमूलवाड यांनी केले. या कार्यक्रमास क्रीडा विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. रमजान मुलाणी, डॉ. श्रीकांत अंधारे, व्यंकट रामतीर्थे, डॉ.दिगंबर तंगलवाड, डॉ. सरिता यन्नावार, सिनेट सदस्य उद्धव हंबर्डे, मेघश्याम सोळंके, अरुण धाकडे, शिवाजीराव हंबर्डे, शिवराम लुटे, कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजयसिंह ठाकूर यांच्यासमवेत विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी