पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या परिसरात युवकाचा मृतदेह वाढल्याने एकच खळबळ
नांदेड| प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास अद्यापायी लागला नसताना नांदेडच्या इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पशु वैद्यकीय दवाखाना परिसरात झाडीमध्ये एका २३ वर्षीय युवकाची धारदार शस्त्रांच्या सहाय्याने हत्या केल्याची घटना शुक्रवारच्या मध्यरात्री उघडकीस आली आहे. या प्रकरणी इतवारा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमोल प्रभू साबणे (वय 23 वर्ष, रा. शिवनगर, नांदेड) हा शुक्रवारी सकाळी नैसर्गिक विधीसाठी पशु वैद्यकीय दवाखान्यातील झाडाच्या आड गेला होता. मात्र तो घरी परतला नाही, यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. त्याचा दुसरा भाऊ श्याम साबणे हा रेल्वेस्थानकावर काम करून घरी परत आल्याने अमोल आज कामावर का..? आला नाही याची विचारपूस केली. सकाळी तो नैसर्गिक विधीला गेला तेंव्हपासून परत आलाच नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. यामुळे भयभीत झालेल्या कुटुंबीयांनी अमोलचा शोध घायाळ सुरुवात केली.
ज्या भागाकडे तो नैसर्गिक विधीसाठी नेहमी जात असे तो पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात मोबाइल बॅटरीच्या सहाय्याने शोधला असता तेथील झुडपांत अमोलचा मृतदेह आढळून आला. मृत अमोल याच्या गालावर, छातीवर, दंडांवर, पोटावर व बेंबीजवळ धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा दिसून आल्या. याची माहिती इतवारा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा केला.
याप्रकरणी श्याम प्रभू साबणे रा.शिवनगर इतवारा नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपस पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक शेख असद हे करत आहेत. जेथे खून केलेला मृतदेह आढळल्याने त्याच्यावर पाळत ठेवून कुणीतरी त्याचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनि बांधला असून, या घटनेचा तपास सुरु आहे.