मुखेड मध्ये फुले-आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त ७९ रक्तदात्यांने केले रक्तदान -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर।
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले व विश्वभुषण, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यारक्तदान शिबीरात ७९ रक्तदात्यानी रक्तदान केले. तसेच स्मारक परिसरात चवदार पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. अशी माहिती समन्वयक राहूल लोहबंदे यांनी दिली.

नांदेड येथील जिजाई ब्लड सेंटर या ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलित करण्यात आले. रक्तदान शिबिरास गटविकास अधिकारी तुकाराम भालके, मुख्याधिकारी धनंजय थोरात, पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, तालुका आरोग्य अधिकारी रमेश गवाले आदी सह जेष्ठ नेते, जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, काँग्रेस प्रदेश सचिव डाॅ.श्रावण रॅपनवाड, मधुकर महाराज बारुळकर, सदाशिवराव पा.जाधव, विश्वनाथ कोलमकर, भाजपाचे टि.व्ही.सोनटक्के, माधवअण्णा साठे, काँग्रेस तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पा.मंडलापुरकर, प्रहारचे शिवाजी गेडेवाड, दिलीप कोडगीरे, शेतकरी नेते शिवशंकर पा.कलंबरकर, शिवराज पा.जाधव, शिवसेना ता.प्रमुख नागनाथ लोखंडे, रियाज शेख, रामेश्वर पा.इंगोले, छावा संघटनेचे गिरीधर पा. केरूरकर, युवासेनेचे योगेश मामीलवाड आदींनी भेट दिली. 

रक्तदान शिबिरात काँग्रेस प्रवक्ते दिलीप कोडगिरे, डॉ.प्रशांत खंडागळे, डॉ. अविनाश पाळेकर, दिपक लोहबंदे, माजी नगरसेवक राहुल लोहबंदे, मनसेचे संतोष बनसोडे,  डॉ.राहुल कांबळे, लतिफ चांडोळकर, मुख्तार सेठ बेळीकर, लखन गायकवाड यांच्यासह ७९ जणांनी रक्तदान केले आहे.

यावेळी जयंती महोत्सवाचे अध्यक्ष अनिकेत कांबळे, सचिव साजिद शेख, कोषाध्यक्ष विजय लोहबंदे , कार्याध्यक्ष अंतेश्वर कांबळे ,उपाध्यक्ष परमेश्वर कांबळे, अशितोष कांबळे, समीर शेख , विशाल कांबळे , गायकवाड , राहुल कांबळे,  अनिल बनसोडे , किरण घोडके , सुशील सोनकांबळे , सुनील बनसोडे , मुन्ना कांबळे , राजरत्न गवळे यांच्यासह सार्वजनिक संयुक्त जयंती महोत्सवाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive