नांदेडच्या श्याम कोकाटे यांच्या पॅनलचा दणदणीत पराभव करत शिवाजीराव कोकाटे आणि संजय पवार यांच्या पॅनलचा झेंडा -NNL

सेवा सहकारी सोसायटी निवडणूक


नांदेड।
नांदेड शहरातील विमानतळ सांगवी येथील नुकत्याच झालेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेस नगरसेवक प्रतिनिधी शाम कोकाटे पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा उडवत एकता शेतकरी पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. पॅनलप्रमुख शिवाजीराव कोकाटे आणि संजय पवार यांचा पॅनलचा झेंडा फडकला आहे.

सांगवी बुद्रुक येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक मागील काही दिवसापासून चांगलीच रंगात आली होती. अखे रविवार दिनांक तीन एप्रिल रोजी निवडणूक पार पडली. दुपारी येथील जिल्हा परिषद शाळेत मतमोजणी झाल्यानंतर एकता शेतकरी पॅनलने दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसचे नगरसेवक प्रतिनिधी शाम कोकाटे पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा उडवत मोठ्या फरकाने सेवा सहकारी सोसायटीवर एकता शेतकरी पॅनलचा झेंडा फडकला आहे. स्वाभिमानी शेतकरी पॅनलचा यात मोठा पराभव झाला आहे.

एकता शेतकरी पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे गंगासागर शिवाजीराव पाटील कोकाटे, आशाबाई गंगाधर पाटील कोकाटे, सुरेश प्रभू पवार, मारोती दत्‍तराम कोकाटे, लक्ष्‍मण तोलाजी कोकाटे, गोविंदराव नेमाजी कोकाटे, रवी निवृत्ती कोकाटे, राजेश्वर रावजी कोकाटे, बाबाराव पुंडलिकराव कोकाटे हे विजय झाले आहेत.

या पॅनलसाठी मागील काही दिवसापासून सतत मतदारांशी संपर्क साधत परिश्रम घेणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, गंगाधर पाटील कोकाटे, संजय पवार, रमेश पाटील कोकाटे, विनायक पाटील कोकाटे, राजू पाटील कोकाटे, संदीप गिरी, उल्हास पाटील कोकाटे, विनायक पाटील कोकाटे, आनंद पवार, पद्माकर पवार, शिवानंद कोकाटे, मधुकर पवार, किशनराव कोकाटे, विठ्ठलराव कोकाटे, तुकाराम बुक्तरे, निखील कोकाटे, गणेश पवार, शिवाजी पाटील पवार, दिगंबर पाटील कोकाटे, गोपीनाथ कोकाटे, गजानन कोकाटे, बळीराम कोकाटे, दत्ता कोकाटे, सतीश कोकाटे, भगवान कोकाटे, श्रीकांत पवार, जनार्दन पवार, विजय पवार, चंद्रकांत पवार, विकी कोकाटे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. विजयी उमेदवारांचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी पॅनलच्या वतीने विजयी उमेदवारावर गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी