उमरदरी सोसायटीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला -NNL

शिवाजी जाधव यांच्या पँनलचे सर्व उमेदवार बिनविरोध


नांदेड|
उमरदरी ता.मुखेड येथील सेवा सहकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुखेड तालुका अध्यक्ष शिवाजी नागोराव जाधव उमरदरीकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यासहीत 13 ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

शिवाजी जाधव यांच्या पँनल विरोधात गावातून एकही नामांकन पत्र दाखल करण्यात आले नाही त्यामुळे हे 13 ही उमेदवार बिनविरोध निघाले आहेत. यापूर्वी देखील शिवाजीराव जाधव यांचे आजोबा स्व.माधवराव पाटील जाधव यांनी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून गावात सहकार चळवळ चालविली होती.शिवाजी जाधव यांच्याकडून देखील या माध्यमातून सहकार क्षेत्रात तालुक्यात परिवर्तन करून विकासात्मक कार्य होईल अशी अपेक्षा सभासदांकडून व जनतेतून व्यक्त होत आहे.

शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली उमरदरीच्या ग्रामपंचायत निवडणूकीत सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणण्याची किमया देखील त्यांनी सॅन 2021 साली केली. तालुक्यातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांना न्याय देण्याचे काम ते सातत्याने करीत असल्याने तालुक्यातील लोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. संजय बनसोडे, माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम, राष्ट्रवादीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष हरीहर भोसीकर, नांदेड जिल्हा शहर अध्यक्ष डॉ. सुनील कदम , माजी आ.शंकरअण्णा धोंडगे, माजी आ.बापूसाहेब गोरठेकर,रामेशराव देशमुख शिळवणीकर आदीसह अनेकांनी शिवाजी जाधव यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी