उष्माघात प्रतिबंधक होमिओपॅथीक औषधाचे विनामुल्य वाटप-डॉ.हंसराज वैद्य -NNL


नांदेड|
जागतिक तथा अंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आज दिनांक 1/5/2022 पासून सर्व कामगार,शेतकरी, कष्टकरी,रस्ता कामगार,पुलीस मित्र ,महानगरपालिका कामगार, उन्हात कामे करणारे सर्व कामगार,विट काम गार,माती कामगार,गिटी- रेती कामगार,गवंडी कामगार,बांधकाम करणारी मंडळी,खाणी कामगार तथा उन्हात गेल्या शिवाय किंवा काम केल्या शिवाय भागतच नाही अशा सर्वांसाठी वैद्य रुग्णालय वजिराबाद चौक व सहकार महर्षि पद्मश्री शामरावजी कदम होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सिडको नांदेड येथे उष्माघात प्रतिबंधक होमिओपॅथिक औषधाची, ’अमुल्य पण विना मुल्य’ मात्रा देण्याचे आयोजिले आहे.

दिवशेंदिवस नांदेडचे तपमान वाढतच आहे. भविषात उष्मांकाची लाट येण्याची व राहण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.नांदेडचे तपमान 45 या पेक्षाही जास्तच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढ्या तपमानात एक  क्षणाचा उन्हाचा चटका तथा फटकाही उष्माघात होण्यास पुरे आहे. उष्माघात जिव घेणारा ठरू शकतो. त्यातच कोरोना संसर्गाच्या लाटेचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे व नाकारता येत नाही. गरिबांना दोन्ही आजार जिवघेणे ठरू शकतात. गेल्या कोरोना महामारीच्या घप्रतिबंधक अर्सिनकम अल्बम 30 दिले. त्या कुटूंबा पैकी कांहीच फक्त पॉझिटिव आले.  पण संदर्भिय कुटूंबातला एकही व्यक्ती दगावला नाही. 

कारण त्यांना होमिओपॅथिक औषधाची प्रतिबंधात्मक मात्रा मिळालेली होती, हे त्याचे फलितच म्हणावे लागेल.! म्हणूनच उद्या जागतिक कामगार दिना पासून सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजे पर्यंत उष्माघात व कोरोना प्रतिबंध मात्रा विना मुल्य दिल्या जाणार आहेत.तेव्हा सर्व जनतेने/नांदेड वाशियानी या संधीचा फायदा घ्या, असे आवाहान डॉ.हंसराज वैद्य, डॉ.शितल ताई भालके तथा एस.एम पी.एस.के. होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या समस्त संचालक मंडळानी केले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी