आग विझविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचा आगीत होरपळून मृत्यू-NNL


नंदुरबार। 
उसाच्या शेतीला शॉर्टसर्किट होऊन लागलेली आग विजविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

ऊसाच्या शेताला लागलेली आग विझवताना शेतकऱ्याला प्राण गमवावे लागले. नंदुरबार जिल्ह्यातील बामखेडा येथे हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. शेतकरी संजय एकनाथ चौधरी आपल्या ऊसाच्या शेतात लागलेली आग विझवण्यासाठी गेले होते, मात्र आगीत होरपळल्याने त्यांना जीव गमवावा लागला. विजेच्या तारांची ठिणगी पडल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. वीज वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याच्या संतप्त भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

विजेच्या तारांची ठिणगी पडून आग

विजेच्या तारांची ठिणगी पडल्याने ही आग लागल्याची माहिती आहे. सारंगखेडा पोलीस ठाण्यामध्ये याबाबत नोंद करण्यात आलेली आहे. वीज वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे संजय चौधरी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी