अर्धापूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार : शेतकरी भयभीत -NNL

गेल्या वर्षी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या १८ जणावरांचा अद्याप मावेना मिळाला नाही

अर्धापूर, निळकंठ मदने।
तालुक्यातील लहान येथील एका शेतात शेळीच्या कळपावर बिबट्याने हल्ला चढवून वीस हजार रुपये किंमतीची वेळी फस्त केली, गेल्या वर्षी अर्धापूर तालुक्यातील वीस जनावरांना बिबट्याने फस्त केले होते, त्यांचा अद्याप संबंधीतांना मावेजा अद्याप मिळाला नाही. विशेष तो बिबट्या मोकाटच होता. याकामी वनविभागाला यश आले नाही. त्यामुळे अधूनमधून बिबट्याचे हल्ले सुरुच असून, अद्याप किती जणावरांचे प्राण जाणार अशी शेतकऱ्यांमध्ये उघड चर्चा आहे.
 
अर्धापूर तालुक्यातील लहान येथील सुधाकरराव इंगळे यांच्या शेतात चंद्रकलाबाई रमेशराव पाणबुडे यांच्या शेळ्यांचा कळप होता, गुरुवारी रात्री अंधारात बिबट्याने या शेळ्यांच्या कळपावर हल्ला चढवला, यावेळी एक वीस हजारांची शेळी बिबट्याने फस्त केली, बाकीच्या शेळ्यांने  अचानक झालेल्या हल्ल्याने आरडाओरडा करताच शेतमजुरांची आरडाओरड केली. तर यावेळी बिबट्या एक शेळी फस्त करुन पसार झाला.

यामुळे सध्या हाळदीची जागल व कॅनाल व विहीरीचे पाणी पिकांना देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात मुक्कामी जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांत अनेक महिन्यांपासून भिंतीचे वातावरण पसरले आहे. याकामी अनेकदा निवेदने देऊनही वनविभागाला बिबट्याला पकडता आले नाही, त्यामुळे याकामी उच्चस्तरीय कारवाई होऊन बिबट्याला जेरबंद करुन शेतकऱ्यांना, संबंधीतांना जनावरांचा मावेना मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी