हात पिवळे होण्यापूर्वीच पित्याने केली मुलीची हत्या; मुखेड तालुक्यातील घटना -NNL

आईच्या फिर्यादीवरून निर्दयी पित्यावर खुनाचा गुन्हा दाखल 


नांदेड/मुखेड|
घरातील परिस्थिती हलाकीची असल्याने मुलीच्या लग्नासाठी पैशाच्या बंदोबस्त करण्यात अपयशी ठरलेल्या पित्याने हात पिवळे करण्यापूर्वीच तिची हत्या केल्याची घटना मुखेड तालुक्यातील मौजे जामखेड येथे नुकतीच उघडकीस आले आहे. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून निर्दयी पित्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, दि.१९ एप्रिल रोजीचे १०.३० ते ११.०० वाजेच्या  दरम्यान, फिर्यादी आहिल्याबाई यांचे राहते घरी मौजे जामखेड ता. मुखेड जि.नांदेड येथे, यातील मयत नामे सिंधुताई ऊर्फ छकुली पि. बालाजी देवकत्ते, वय 18 वर्षे, व्यवसाय शिक्षण ही विवाह योग्य झाल्याने चांगला वर मिळाल्याने लग्न सोहळा जुळून आला होता. मात्र परिस्थिती हलाकीची असल्याने पित्याने लग्नासाठी पैशाची जुळवाजुळव करू शकला नाही. त्यामुळे मंगळवारी बालाजी देवकते हा घरच्यांना विनाकारण शिवीगाळ करीत होता. तेव्हा फिर्यादी हि पॅटिस मुलीचे लग्न जवळ आले आहे. तुम्ही लग्नाची तयारी करा असे म्हणाली.

यावेळी बालाजी देवकते याने पत्नीस मुलीच्या लग्नाकरीता शेती विकावी लागत असेल तर मुलीला मारलेल बरं म्हणुन मयत सिंधुताईस बाजेच्या लाकडी गातीने मारहाण सुरु केली. यावेळी फिर्यादी सोडविण्यास गेली असता फिर्यादीचे हाताचे मनगटावर आरोपीने मारहाण करुन जखमी केले. आणि सिंधूच्या डोक्यात लाकडी गातीने मारहाण करुन गंभीर जखमी करुन खुन करून घटनास्थळावरून तो फरार झाला आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास गोबाडे व त्यांचे सहकारी घटनास्थळावर पोचले. आणि त्यांनी या घटनेचा पंचनामा केला असून, यात मुलीचा मृत्यू झाल्याचे पाहून फिर्यादी आहिल्याबाई भ्र. बालाजी देवकत्ते, वय ३६ वर्षे, व्यवसाय घरकाम रा. जामखेड ता. मुखेड जि. नांदेड यांनी पतीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादवरुन मुखेड पोलीस ठाण्यात गुरन १२४/२०२२  कलम ३०२, ३२४, ५०४ भादवि प्रमाणे आरोपी बालाजी देवकते यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड व त्यांचे सहकारी करीत आहेत.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive