ईस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर डेडवाल लाच मागणीचा गुन्हा दाखल -NNL


नांदेड|
नांदेड जिल्ह्यातील ईस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर डेडवाल यांच्याविरुद्ध  २ लाखांची लाच मागून ५० हजार स्विकारण्याची तयारी दाखवल्याच्या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने हिमायतनगर - इस्लापूर - भोकर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकार गुटख्याच्या धंद्याशी सबंधित आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दि.२२ एप्रिल रोजी दिली होती. तक्रारीनुसार तक्रारदाराच्या भावाचे नाव गुटख्याच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून नोंद न करण्यासाठी दोन लाख रुपये लाच ईस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर डेडवाल यांनी मागितली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने तक्रार दिली. त्यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दि.२३ एप्रिल रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. 

यावेळी तडजोडीनंतर ५० हजार रुपये लाच स्विकारण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर डेडवाल यांनी मान्य केले होते. त्याअनुशंगाने नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यात येणाऱ्या पोलीस ठाणे ईस्लापूर येथे गुन्हा क्रमांक ४३/२०२२ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर डेडवाल यांनी ५० हजारांची लाच स्विकारण्याचेे मान्य केले म्हणून दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक शेषराव नितनवरे हे करीत आहेत.

ही कार्यवाही पोलीस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक शेषराव नितनवरे, पोलीस अंमलदार हनुमंत बोरकर, एकनाथ गंगातीर, जगन्नाथ अंतवार, सचिन गायकवाड, प्रकाश श्रीरामे, अंकुश गाडेकर, मारोती सोनटक्के यांनी पार पाडली.

तसेच लाचलुचपत विभागाने आवाहन केले कि, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवरील बोलणे, एसएमएस, ऑडीओ, असल्यास तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असल्यास आणि माहिती अधिकारी कायद्यात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती द्यावी यासाठी टोल फ्री क्रमांक 1064(2) कार्यालयाचा फोन क्रमांक 02462-253512, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांचा मोबाईल क्रमांक 7350197197 यावर सुध्दा माहिती देता येईल सोबतच शासनाच्या संकेतस्थळावर, महाराष्ट्राच्या संकेतस्थळावर, फेसबुक पेजवर सुध्दा भ्रष्टाचारा संबंधीची माहिती देता येईल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive