महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा - ॲड रेवण भोसले -NNL


उस्मानाबाद|
महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली असून मुख्यमंत्र्यांसह सर्वच  महाविकास आघाडीतील तथाकथीत पुढारी कायदा हातात घेऊन अराजक तेची स्थिती निर्माण करत आहेत. 

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून विविध ठिकाणी हल्ले करून मस्तवालपणे गुंडगिरी व दहशत निर्माण केली जात आहे. राज्यातील जनतेची सुरक्षितता , सामाजिक अखंडता तसेच कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राखण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. पोलिसांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या पुढाऱ्यांनी महाराष्ट्रात दहशत व गुंडगिरीचा उच्छाद मांडला आहे. 

त्यातच खा. संजय राऊत वारंवार मीडियासमोर चिथावणीखोर वक्तव्य करून राज्यात कायदा व सुव्यवस्थाला तिलांजली देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे खा. संजय राऊत यांच्यावरही गृहखात्याने तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. खा. नवनीत राणा या महिला खासदाराला अर्वाच्च भाषा वापरून दंडुकेशाही व महाप्रसाद देण्याचे व्यक्तव्य केले जात आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे, शेतमजूर, अल्पसंख्यांक आणि बेरोजगार तरुण यांचे प्रश्न सोडविण्यात आघाडी सरकारला कसलेही स्वारस्य उरलेले नाही. त्यामुळे जनतेच्या जीवावर आलेले महाराष्ट्राचे महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून जनतेची अश्या  या लुटमार व दरोडेखोरी करणाऱ्या सरकारच्या जोखडातून सुटका करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग  कोशियारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे तात्काळ शिफारस करण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी