सर्वधर्मसमभावाचे प्रतीक सय्यद बाबुपिर यांच्या ऊर्स निमित्त धामणगाव येथे जय्यत तयारी -NNL

ऊर्स निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


मुखेड, रणजित जामखेडकर।
तालुक्यातील मौजे धामणगाव येथील सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेले सय्यद बाबुपिर  यांच्या ऊर्स सालबादप्रमाणे शनिवार दि.१६ एप्रिल ते रविवार १७ एप्रिल रोजी या दरम्यान संपन्न होणार आहे.सय्यद बाबुपिर यांच्या ऊर्स प्रतिवर्षाप्रमाणे ऊर्सकमिटी व अहैले सुन्नतुल जमात धामणगाव यांच्या वतीने दि.१६ एप्रिल शनिवार रोजी रात्री १०:३० वा.सय्यद सादीक चांद पटेल (माली पटेल) यांच्या घरातून संदलची भव्य मिरवणूक गावातील मुख्य मार्गाने काढण्यात येणार आहे.

कोरोना काळाच्या दोन वर्षांतील निर्बंध मुक्तीनंतर प्रथमताच धामणगाव येथील सय्यद बाबुपिर यांच्या ऊर्स मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार असल्याची माहीती ऊर्स कमिटीने दिली आहे.त्याच अनुषंगाने सय्यद बाबुपिर यांच्या ऊर्सची व यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी ऊर्सकमिटी व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.

या संदलचे विशेष महत्त्व असे की,पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले श्री.शिवलिंग बादशाहा मठसंस्थान बेटमोगरा येथील मठाधिपती सदगुरू डॉ. सिद्धिदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या शुभहस्ते सय्यद बाबुपिर रह.अलै.यांचे संदल व चादर चढवण्यात येत आहे. या ऊर्सला महाराष्ट्रातील व आंध्रप्रदेशातील विविध भागांतून विविध जाती-धर्मांचे हजारों श्रध्दालु येत असतात,हे ऊर्स हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक मानले जाते.

तसेच या ऊर्स निमित्त गावात विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे ही आयोजन केले आहे. दि.१७ एप्रिल रोजी दुपारी ३ वा. जंगी कुस्त्यांचा सामना व रात्री ८ वा. इमरान वारसी टि.व्ही फिल्म व कॅसेट सिंगर मुंबई व नुसरत खानम टि.व्ही कॅसेट सिंगर मुंबई यांच्या जंगी कव्वालीच्या मुकाबला ठेवण्यात आलेला आहे.तसेच सय्यद बाबुपिर रह.अलै यांचे दर्शन व विविध कार्यक्रमाचे लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे अवाहन ऊर्सकमिटीच्या वतीने करण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive