धम्मदीप चावरे यांनी निर्भिडपणे लेखनातून दिशा दाखवली - अनेकांनी व्यक्त केली भावनिक उदगार -NNL

उस्माननगर, माणिक भिसे। येथील ज्येष्ठ पत्रकार धम्मदीप चावरे यांनी आपल्या३०/ ३५ वर्षाच्या कार्यकाळात समाजा उपोयोगि सामाजिक प्रश्र्न असो किंवा राजकीय क्षेत्रातील बातम्या या निर्भिडपणे लेखनातून मांडून नागरिकांना दिशा देण्याचे पवित्र काम पत्रकारितेच्या माध्यमातून केल्याचे कंठ उदगार ज्येष्ठ पत्रकार धम्मदीप चावरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अनेकांनी व्यक्त केले.

उस्माननगर ता.कंधार येथील पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष , दैनिक तरुण भारत, दैनिक लोकमत, लोकपत्र, सकाळ, दैनिक एकमत, दैनिक अजिठा, दैनिक श्रमिक एकजूट अशा अनेक लोकप्रिय दैनिकात निर्भिडपणे पत्रकार म्हणून गेली ३०/३५ वर्षी काम केले.काही काळ त्यांनी जिल्हा प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली .त्याचबरोबर गीतकार,गायक, म्हणून या पंचक्रोशीत आपली ओळख निर्माण केली. असे ज्येष्ठ पत्रकार, धम्मदीपनालंद रामराव चावरे यांचे ४ एप्रिल २०२१ रोजी कोरोनाच्या काळात दुःखद निधन झाले होते.उस्माननगर वीभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघ व गावातील प्रतिष्ठीत नागरिक, हितचिंतक मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात अभिवादन बैठक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी उपसरपंच तथा सिध्दार्थ एजूकेशन  सोसायटीचे अध्यक्ष देवराव सोनसळे, सभापती तथा सरपंच प्रतिनिधी युवा कार्यकर्ते दत्ता पाटील घोरबांड, वामन लोंढे गुरूजी,प्रा.विजय भिसे,काॅग्रेस पक्षाचे तालुकासरचिटणीस सामाजिक कार्यकर्ते आमिनशा फकीर, ग्रामपंचायत सदस्य तथा कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे युवक काॅग्रेस पक्षाचे युवा अध्यक्ष कमलाकर पाटील शिंदे,ग्रा.पं.सदस्य प्रतिनिधी गंगाधर भिसे, अंकुश कांबळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल ताटे, सचिव सुर्यकांत मालीपाटील, गणेश लोखंडे, लक्ष्मण कांबळे,लक्ष्मण भिसे, माणिक लोंढेमामा, राजभूषण चावरे,विश्वभूषण चावरे, यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

ज्येष्ठ पत्रकार धम्मदीपनालंद चावरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अनेकांनी आपले विचार या ठीकानी व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना म्हणाले की, चावरे साहेब हे दुरद्रष्ठी ठेवून त्यांनी पत्रकारीता केली.गोरगरीब लोकांना मदतीचा हात देखील पुढ केला. मुर्ती लहान पण किर्ती महान असे व्क्तत्तीमत्व पत्रकार आपण गमावला आहे.त्यांचे आचार विचार आपल्या मनात नक्कीच प्रेरणादायी ठरणार आसल्याचेमत व्यक्त केले आहे. यावेळी अभिवादन बैठक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा कार्यकर्ते तेजस भिसे यांनी केले,तर आभार पत्रकार गणेश लोखंडे यांनी मानलें.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी