तब्बल 44 वर्षानंतर भेटले वर्गमित्र डॉ. सुहास कुलकर्णी यांची एकसष्टी साजरी -NNL


कराड|
कराडचे सुप्रसिद्ध डॉ. सुहास कुलकर्णी यांच्या एकसष्टी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी 44 वर्षापूर्वीचे टिळक हायस्कूल मधील वर्गमित्र एकत्रित आले. वर्गमित्रांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला एक रंगत आली. व्हाट्सअपमुळे अनेक विखुरलेले मित्र आता या ना त्या कारणाने एकत्र येऊ लागले आहेत. वाढदिवस व गेट-टुगेदर सारखे कार्यक्रम सर्रास सर्व ठिकाणी होताना दिसत आहेत.

एका वर्षापूर्वी टिळक हायस्कूलमधील 1977 - 78 सालातील मित्र एकत्र येऊन त्यांनी व्हाट्सअप ग्रुप तयार केला. मित्रांची विचारांची देवाणघेवाण सुरू झाली.  4 मे ला डॉ. सुहास कुलकर्णी यांचा एकसष्ठी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सुहासने स्वतः फोन करून सर्वांना प्रेमाने निमंत्रण दिले.  वाढदिवशी सर्व मित्र प्रत्यक्ष एकमेकांना आनंदाने भेटले व जुन्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमास म्होप्रे, मल्हारपेठ, सातारा, पुणे, मुंबई, सांगली, वडगांव, कोल्हापूर, बेळगावहून डॉ. सुहासचे  मित्र आले होते. यामध्ये कोणी वकील, डॉक्टर, शिक्षक, प्रोफेसर, सीए, पीएसआय, पोलीस खाते, बँक अधिकारी, एलआयसी ऑफिसर, नगरसेवक, उपनगराध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित व्यापारी बनले आहेत. दरम्यान हे सर्व उपस्थित राहिले ते  वर्गमित्र म्हणूनच. साठी, एकसष्टीला असणाऱ्या या सर्वांनी "झिंग झिंग झिंगाट" या गाण्यावर मनसोक्त डान्स करून "अभी भी हम मै जवान" म्हणत आनंद साजरा केला.

आनंदाची गोष्ट म्हणजे तत्कालीन शिक्षक कणसे सर स्वतः  कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला.  तत्पूर्वी सकाळी धार्मिक पूजा झाल्यावर डॉ. सुहास कुलकर्णी यांची  तुलादान झाली. डॉ.सुहास कुलकर्णी यांनी सर्व वर्गमित्रांना भेट म्हणून सेंद्रिय गूळ, काकवी दिली. 44 वर्षांपूर्वी एकत्र असलेल्या वर्गमित्रांनी डॉ. सुहास कुलकर्णी यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले.

कार्यक्रमात वर्गमित्र विजय वरवडे यांनी सुरेख गाणी गायली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर शानभाग यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनीता धर्माधिकारी, दिलीप धर्मे, रमेश ओझा, चव्हाण, पवार, कुलकर्णी, राजेंद्रने परिश्रम घेतले. आपल्या वडिलांवर मित्रांचे प्रेम पाहून परदेशातून आलेल्या सिद्धार्थ कुलकर्णी याला आनंद झाला. सौ. वहिनींने ही धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. ओके.. ओके.. थँक्स अशा जुन्या शालेय घोषणा दिल्या. शेवटी कराडचे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी सर्वांनी दोन महिन्यांनी परत एकत्र येण्याची, भेटण्याचे  आवाहन केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी