आपच्या तालुका उपाध्यक्षपदी नागनाथ पा.पाळेकर तर सचिवपदी नामदेव बोमनवाड -NNL

 


मुखेड, रणजित जामखेडकर।
आम आदमी पार्टी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव इंगळे यांच्या हस्ते मुखेड तालुका आम आदमी पार्टीची कार्यकारणीची निवड करण्यात आली.

 यामध्ये सचिवपदी नामदेव बोमनवाड तर उपाध्यक्ष पदी नागनाथ पा. पाळेकर व संभाजी लवटे यांची नियुक्ती केली आहे. नुकतीच मुखेड येथे आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येउन नांदेड जिल्हा अध्यक्ष कदम यांनी तालुकाध्यक्ष पदी विठ्ठलराव इंगळे यांची निवड केली होती. 

आम आदमी पार्टी चे विचार व कार्य तालुक्यातील जनतेपर्यंत पोहोचवून सक्षम राजकीय नेतृत्व देण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याचे आवाहन करण्यात आले. या नियुक्ती बद्दल कार्यकर्त्यांत आनंद व्यक्त  होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive