पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते जवळगाव ग्रामपंचायत सन्मानित-NNL


नांदेड।
जिल्हा परीषद स्थापनेचा हिरक महोत्सव समारंभ प्रसंगी ग्रामपंचायत जवळगाव तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेडला आय. एस. ओ. ९००१- २०१५  नुसार मानांकन प्राप्त करून दिल्याबद्दल सरपंच सौ प्रतीक्षा नितेश पवार व ग्रामसेवक श्री शैलेंद्र नरहरराव वडजकर यांना जिल्हा परिषद नांदेड कडून माननीय
 अशोकरावजी चव्हाण मंत्री सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री नांदेड यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर मॅडम, जिल्हाधिकारी डॉ विपीन इटणकर साहेब आमदार बालाजी कल्याणकर सर, जिल्हा परिषदेचे सर्व माजी अध्यक्ष पदाधिकारी, सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. जवळगाव ग्रामपंचायतीने स्मार्ट बनवण्यासाठी व पर्यावरण पूर्वक बनवण्यासाठी माझी वसुंधरा अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याची नोंद सदर प्रसंगी घेण्यात आली.

 गावात रस्‍ता दुतर्फा वृक्ष लागवड मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड स्मशानभूमी व दफनभूमी मध्ये फळबाग लागवड गावातील स्वच्छता विषयक उपक्रम सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन व तसेच घनकचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करणे इत्यादी कामे सदर वर्षात गावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लोकसहभागातून पूर्ण केल्याबद्दल कौतुक करण्यात आले. थोडेसे माय बापासाठी विरंगुळा कक्ष स्थापन करून मनोरंजनासाठी टेलिव्हिजन व चांगले ग्रंथालय उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी