बिलोली शहरात महाराणा प्रताप यांची जयंती उत्सहात साजरी -NNL


बिलोली।
शहरात महापराक्रमी वीर योद्धा महाराणा प्रताप यांची 482 वी जयंती सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्सहात  साजरी करण्यात आली.

शहरातील पंचायत समितीच्या परिसरात सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने वीर योद्धा महापराक्रमी राजा महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.यावेळी माजी नगराध्यक्ष राणा रणवीरसिंह चौहान,माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार , माजी उपाध्यक्ष यशवंत गादगे, माजी उपाध्यक्ष शंकर मावळगे, भाजप युवा तालुकाध्यक्ष इंद्रजीत तुडमे यांनी  महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस दिपप्रज्वलन करून मोठा पुष्पहार घातला. 

या प्रसंगी जेष्ठ पत्रकार रत्नाकर जाधव, बालाजी गेंदेवाड सर, दिलीप उत्तरवाड, गंगाधर पुप्पलवार,  नगरसेवक  अरुण उप्पलवार,साईनाथ आरगुलवार, राज गादगे,पत्रकार शिवराज रायलवाड, हर्ष कुंडलवाडीकर, बाबुराव इंगळे,गंगाधर कुडके,प्रा.मोहसीन खान, सादिक पटेल, राजू पाटील शिंदे,सय्यद रियाज, साईनाथ शिरोळे, मुकिंदर कुडके,बाबू कुडके, सुनिल भास्करे, शिवदान ठाकूर,कुलदीप ठाकूर,मोनू चौहान यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी,पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते, व  प्रतिष्ठित व्यक्ती,व्यापारी उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचे आयोजन राणा उदयसिंह चौहान व महेंद्र गायकवाड यांनी केले होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार राजेंद्र कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन  मुकिंदर कुडके यांनी मानले. या प्रसंगी राणा उदयासिंह चौहान यांनी राजपूत उद्योग ग्रुपच्या वतीने सर्व मान्यवरांना त्यांच्या ग्रुपच्या निर्मित पारकर  पेन,डायरी,टी शर्ट  देऊन सन्मानित केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी