नायगांवच्या पत्रकारांनी सर्वसामान्यांच्या समस्या निवारणापाठोपाठ विकासाला चालना दिली- माजी आ.वसंतराव चव्हाण -NNL

राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त तालुका मराठी पत्रकार संघाचा चव्हाण परिवारांकडून यथोचित सन्मान


नायगांव (बा.)नांदेड।
तालुक्यातील पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सत्य व वास्तव लिखाण करित येथील सर्वसामान्य जनतेच्या समस्या निवारणापाठोपाठ विकासकामांना चालना दिल्याचे प्रांजळपणे मान्य करावेच लागेल असे स्पष्ट करित आपले कार्य निष्ठेने व कर्तव्यतत्परतेने केल्यामुळेच तालुका मराठी पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारास पात्र ठरला असून त्यांना राज्यात मिळालेला बहूमान आपणांसह तालुक्यातील जनतेसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार नांदेड  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष  व नायगांवचे माजी आ.वसंतराव पाटील चव्हाण यांनी काढले.

 मराठी पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषद,मुंबई च्यावतिने नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाला यंदाचा स्व.वसंतराव काणे आदर्श तालूका मराठी पञकार संघ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याने जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. चव्हाण परिवारांकडून तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष श्रीनिवास पाटील चव्हाण यांचे फाॅर्म हाऊस,नायगांव (बा.) येथे निसर्गरम्य वातावरणात दि.१५ मे रोजी सायंकाळी या  सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


या सोहळ्यास प्रमुख पाहूणे म्हणून नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ॲड.प्रदिप नागापूरकर,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माधवराव बेळगे,हणमंतराव पाटील चव्हाण,नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर,जिल्हा उपाध्यक्ष तथा,तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा.भवरे,माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार,मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गजानन चौधरी,तालुका सरचिटणीस दिलीप वाघमारे आदी मान्यवरांची यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना माजी आ.चव्हाण म्हणाले की, नायगांव तालुका मराठी पञकार संघाचे कार्य मोलाचे असून राजकीय जडणघडणी सह तालुका निर्मिती बरोबरच अनेक जनहितांच्या कार्यातही त्यांचे उत्तुंग योगदान असल्यानेच राज्यभरात नायगांवचा नावलौकिक झाला असून त्यांच्या कर्तत्वाला बळ व प्रेरणा देण्यासाठीच त्यांचा सन्मान सोहळा आपल्या परिवाराच्या वतिने आयोजित केल्याचे सांगून यापूढेही पत्रकारांच्या प्रेरणादायी कार्यापाठोपाठ प्रसंगी त्यांच्या व्यक्तिगत समस्या सोडविण्यासाठीही आम्ही आपल्या पाठीशी सदैव असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 याप्रसंगी बोलतांना जिल्हाध्यक्ष ॲड.नागापूरकर यांनी आपल्या मनोगतातून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व पत्रकारांचे लढवय्ये नेतृत्व एस.एम.देशमुख सर व परिषदेच्या तसेच,नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाच्या विविध उपक्रम व न्याय,हक्कांबाबतच्या आंदोलनात तसेच,संघटनात्मक वाढीसाठी नायगांव तालुका मराठी पञकार संघ अग्रेसर ठरला असल्यानेच त्यांची नोंद परिषदेने घेतली आहे.सामाजिक बांधिलकी जोपासीत पत्रकारिता करतांनाच संघटनेच्या वेळोवेळींच्या आदेश व सुचनांचे पालन केल्यानेच ते गौरवास पात्र ठरल्याचे सांगून आगामी काळातही सामाजिक व सांघिक उपक्रमांत तसेच,आपल्या अडी- अडचणी सोडवण्यासाठी एकसंघ राहून जनतेचे प्रश्न मांडत आपल्या मागण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांसह पत्रकारांना केले.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष सोनखेडकर यांनी आपल्या मनोगतातून नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्याची माहिती दिली. प्रारंभी चव्हाण परिवारांच्या वतिने उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.तसेच, पत्रकारांच्यावतिनेही यावेळी माजी आ.चव्हाण यांचे जिल्हाध्यक्ष ॲड.नागापूरकर यांच्या हस्ते सत्कार करुन आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दत्तामामा येवते यांनी तर, उपस्थितांचे आभार नायगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.रविंद्र चव्हाण यांनी मानले.

 या कार्यक्रमास सुधाकरराव पाटील चव्हाण,नगराध्यक्षांचे प्रतिनिधी नारायण जाधव,डाॅ. विश्वास चव्हाण,नगरसेवक पंकज चव्हाण,गजानन चव्हाण, जेष्ठ पञकार गंगाधर भिलवंडे, मनोहर तेलंग,पंडित वाघमारे, सुभाष पेरकेवार,तालुका सहसचिव रामप्रसाद चन्नावार, तालुका उपाध्यक्ष रामराव ढगे,गंगाधर गंगासागरे,गोंविंद नरसीकर,शिवाजी पन्नासे, लक्ष्मण बरगे,शेषेराव कंधारे, मारोती बारदेवाड,बालाजी हानमंते,मधुकर जवळे,माधव पवार,विश्वाभंर वन्ने,बळीराम गायकवाड,सहदेव तुरटवाड, आनंद सुर्यवंशी,प्रकाश महिपाळे,शेषराव बेलकर, साहेबराव धसाडे,श्याम गायकवाड,निळकंठ जाधव, भगवान शेवाळे,हणमंत वाडेकर, शेख अजिम,आनंदा डाकोरे, विठ्ठल गोडगेवार,धम्मदिप भद्रे, परमेश्वर जाधव,अंकुश देगावकर,सत्तार ईनामदार आदींसह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीनिवास पाटील चव्हाण, प्रा.रविंद्र चव्हाण,दत्तामामा येवते,प्रा.बाबासाहेब शिंदे, श्रीकांत चव्हाण,रमेश शिंदे, संजय चव्हाण,बालाजी शिंदे, श्रीनिवास शिंदे,साईनाथ चन्नावार,कैलास ताटे,विश्वनाथ तमलुरे,अजय सुर्यवंशी आदींसह चव्हाण परिवार व त्यांचे हितचिंतक,समर्थकांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी