अर्धापूरच्या पार्डी गावाजवळ बस -कंटेनरची समोरासमोर धडक; अनेक जण जखमी- NNL

१० जखमींना उपचारासाठी नांदेडच्या शासकीय इस्पितळात दाखल


अर्धापूर/नांदेड।
नांदेड- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पार्डी म.जवळ बस-कंटेनरचा अपघात दि.१२ गुरूवारी सकाळी झाला आहे. या दुर्घटनेत चालकासह बरेच जण गंभीर जखमी झाले असून, जखमींना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अर्धापूर तालुक्यातील पार्डी म. गावाजवळ नांदेड ते हिंगोली मार्गे जाणारी बस क्र.( एम एच 20 बी एल 1707 ) आणि वारंगा ते नांदेड मार्गे येणारा कंटेनर क्रमांक (आर.जे.32 जी.बी. 7101 ) दोघांची समोरासमोर जबर धडक झाली. या दुर्घटनेत एसटी चालक रेशमाजी फुले, वय 55 नांदेड पाय फॅक्चर झाला आहे, गोदावरी पवार, वय 65, गंगाराम पवार वय, 72 दोघे रा.शाहापुर वाडी, यशवंत लढे, मेंढला वय 45, विजय राजे पुसद वय 70 ,सुभाष मस्के, वय 65 यांच्यासह 4 जण गंभीर जखमी झाले आहेत तर 15 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे. 


सदर बसमध्ये पंचवीस ते तीस जण प्रवास करत असल्याची माहिती मिळाली असून बसमधील 25 जण जखमी झाले आहेत तर 10 जण गंभीर जखमी आहेत. यावेळी घटनास्थळी 108 रुग्णवाहिकेचे डॉ.आनंद शिंदे, चालक रणधीर लंगडे व महामार्ग पोलीस रमाकांत शिंदे,ज्ञानेश्वर तिडके, गजानन कदम, संभाजी मोरे, वसंत सिनगारे परिसरातील नागरिकांनी जखमींना मदत केली.  महामार्ग व 108 रुग्णवाहिकेने जखमींना शासकीय रुग्णालय नांदेड विष्णुपुरी येथे उपचारासाठी दाखल केले. यावेळी महामार्ग पोलीसांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.

पार्डी म. येथील तरुणांनी केली मदत - अपघाताची माहिती मिळताच अपघात स्थळी पार्डी म. येथील तरुण धावत गेले आणि बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आणि बस चालकांना सुखरूप बाहेर काढले यावेळी शंकर हापगुंडे, श्याम गिरी, गजानन हापगुंडे, मारोती कवडे, मुरलीधर कांबळे, प्रेम ठाकूर, चांदू कांबळे, बंडू मदने आदी तरुणांनी बसमध्ये अडकलेल्या चालकाला आणि एक प्रवाशी महिलेला बाहेर काढले. तसेच अपघातग्रस्तांना अंबुलन्स मध्ये पाठवून दिले. महामार्गच्या कामातील ढिसाळ नियोजनामुळे अपघात - नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गचे काम सुरू असून एक मार्गी वाहतूक सुरू आहे. काम सुरू असल्याचे दिशादर्शक फलक नाहीत. संबंधित गुत्तेदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे भीषण अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. पण प्रशासकीय पातळीवरून संबंधीत गुत्तेदाराच्या बाबतीत कुणीच गांभीर्याने घेत नाही. असा आरोप परिसरातील नागरीक करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive