शिवशंकर पा. कलंबरकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मराठवाडा युवा अध्यक्षपदी निवड -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर।
शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नांसाठी संघर्ष करून,प्रश्न सुटे प्रयन्त प्रश्नांचा पाठलाग करणारे अभ्यासू,लढाऊ आणि निस्वार्थ नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख निर्माण झालेली आहे. 

असे शिवशंकर पाटील कलंबरकर यांची दि.९ मे रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष डॉ.प्रकाश पोपळे सर यांच्या हस्ते,युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमरभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली,शेतकरी नेते हनुमंत पा.राजेगोरे,किशनराव कदम यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.

शेतकरी,मजूर,कामगार,सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवशंकर पाटील कलंबरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थ काम करत आहेत.हे पाहून त्यांची युवाजिल्हाध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्षपदी बढती करण्यात आली आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive