मिरची पूड टाकून,तलवारीच्या धकावर जबरी चोरी करणाऱ्यां तिघांना स्थागुशाने केली अटक -NNL


नांदेड|
शहरातील धनेगाव शिवारातील कापूस संशोधन केंद्राच्या समोरून स्कुटीवर जाणाऱ्या एका व्यापाऱ्यास तलवारीचा धाक दाखवून आणि डोळ्यात मिरची पूड टाकून लुटण्यात आले होते. याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास  करून आरोपीना अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिले होते. त्या आदेशानुसार स्थागुशाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी एका कार्यक्रमात आलेल्या त्या फरार आरोपीना पथकाच्या साहाय्याने अटक केली आहे.


नांदेड जिल्ह्यासह अनेक तालुक्यात दुचाकीस्वारांना शात्राचा ढाका दाखवून आणि डोळ्यात मिरची पूड टाकून लुटण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. असाच प्रकार नांदेड ग्रामीण हद्दीत दि.१५ रोजी घडला आहे. येथील एक व्यापारी स.अतिक स.रशीद हे आठवडी बाजारात व्यवसाय करून जमलेली रक्कम घेऊन वाजेगाव येथील घराकडे स्कुटीवरून जात होते. दरम्यान कापूस संशोधन केंद्राच्या समोरून स्कुटीवरून जात असताना तिघांनी पाठीमागून दुचाकीवरून येऊन डोळ्यात मिरची पूड टाकली आणि त्यानंतर तलवारीचा धाक दाखवून ४ लक्ष ६० हजार नगदी रक्कम, आणि दुचाकीची अंदाजे ७० हजार किंमत असे मिळून व्यापाऱ्याकडून हिसकावून घेऊन पलायन केले. याबाबत दिलेल्या तक्रारीवरून लूटमार प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या गुन्ह्याचा तात्काळ शोध लावून आरोपीना अटक करण्यात यावेत असे आदेश पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी स्थागुशाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर याना दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करत मिळालेल्या गुप्त माहितीवरून स्थागुशाच्या पथकातील पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोविंद मुंडे, जसवंतसिंह साहू, मारोती तेलंग, मोतीराम पवार याना रवाना करण्यात आले होते. पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी सोहेब खान शब्बीर खान वय २१ वर्ष यास ताब्यात घेतले. आणि पोलिसी खाक्या दाखवित विचारपूस केली असता त्याने सांगितले कि, नूरखा हुसेन पठाण वय ३५ वर्ष, सय्यद ताहेर स.अब्दुल वय ३४ वर्ष याना सोबत होते. यावरून पोलिसांनी या तिघांना अटक केली असून, या दरोडेखोराना पकडल्यानंतर शहरासह जिल्ह्यात घडलेल्या घटनेची उकल होईल अशी अपेक्षा नागरिकांना आहे. या कार्यवाही बद्दल पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोली, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, यांनी स्थागुशाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व त्यांचे टीमचे कौतुक केले आहे.

हिमायतनगर तालुक्यात मागील २० दिवसाच्या फरकत दोन ठिकाणी दुचाकीस्वारास अडवून डोळ्यात मिरची पूड टाकून लुटण्यात आले होते. यात एका खाजगी फायनान्स कंपनीच्या फिल्ड ऑफिसर आणि एका शेतकऱ्याचा समावेश होता. या घटनांचा स्थागुशाने अटक केलेल्या आरोपींशी काही संबंध आहे का...? याचा तपास करण्यात यावा अशी मागणी लुटमारीला बळी पडलेल्यानि केली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive