उस्माननगर येथे अब्दुल रहेमान बाबा सैलानी सरकार संदल उत्साहात साजरा -NNL


उस्माननगर, माणिक भिसे।
कंधार तालुक्यातील मौजे उस्माननगर येथे नुकताच गावातील प्रमुख मार्गाने ( सरकार  बाबा) इस्माईल तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली अब्दूल रहेमान बाबा सैलानी सरकार संदल काढून उत्साहात साजरा करण्यात आला.

मागील दोन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना या रोगामुळे सर्व उत्साहावर बंदी केल्यामुळे भक्तामध्ये नाराजी दिसून आली होती.काही महीन्यापासून ही बंदी उठवल्यानंतर सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.उस्माननगर येथे अब्दुल रहेमान बाबा सैलानी सरकार यांची यात्रा भरविण्यात आली होती.त्यानंतर दि ९ मे रोजी येथील प्रमुख ( बाबा) सरकार इस्माईल तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य संदल मिरवणूक काढण्यात आली.मुख्य पुजारी स्वप्नील शिंदे यांच्या घरापासून ते गावातील प्रमुख मार्गाने संदल ढोल ताशाच्या निनादात काढून मिरवणूक उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांनंतर महाप्रसादाचे भक्तांनी आस्वाद घेतला.

संदल पाहण्यासाठी महीला-पुरूष लहान मोठ्यांनी गर्दी केली होती. संदल कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देविदास धोगडे, रियाज भाई सय्यद, संदेश वाघमारे, साहेबराव भिसे, शेख सत्तार,ममदाली शेख, विनायक गणगोपले,शेख सत्तार, मगदूम तांबोळी, स्वप्नील शिंदे, चांदू वाघमारे,निजामोद्दीन शेख,सद्दाम पिंजारी,करीम खाँ पठाण,तेजस भिसे,आजय घोरबांड, संजू लंकढाई, इब्राहिम तांबोळी, मुस्ताक शेख, विष्णुकांत कांबळे नांदेडकर, सोनबा शामदीरे,चांदू बाबळे ,विकी सोनटक्के, बालाजी जाधव सिडको, यांच्यासह सरकर मित्र परिवार व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी