इंजि हरजिंदर सिंघ संधू यांचा गुरुद्वारा बोर्डातर्फे आशीर्वाद रुपी सन्मान-NNL


नांदेड।
संचखंड गुरुद्वारा बोर्ड आयोजीत सिख समाजाच्या वतीने  सामुहिक विवाह सोहळ्यात इंजि हरजिंदर सिंघ संधू यांच्या उत्तम सामाजिक कार्याची दखल घेऊन "द वर्ल्ड रेकाॅर्ड ऑफ द अर्थ 2022" वर्ल्ड लेवल पुरस्कार व सावित्री गौरव पुरस्कार 2022 जिल्हा लेवल पुरस्कार मिळवून सिख समाजाचे नावलौकिक केलं.

 त्याबद्दल आदरणीय पंजप्यारे साहिबांन यांच्या शुभहस्ते  व गुरुद्वारा बोर्डाचे सर्व सदस्य, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरविंदर सिंघ वाधवा,रविंदर सिंघ कपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल व शिरोपाव देऊन आशिर्वादरूपी सन्मान करण्यात आले

यावेळी हरजिंदर सिंघ संधू, जिल्हा सरचिटणीस, प्रेस संपादक व पत्रकार सेवा नांदेड ,शहर जिल्हाध्यक्ष (सो.मी) काँग्रेस नादेंड यांनी हे गुरू घरचे आशिर्वाद मिळणे हे माझे भाग्यच आहे असे त्यांनी म्हंटल आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive