राष्ट्रीय महामार्गावर शिक्षक कॉलनी परिसरात दुभाजकाच्या नागरिकांना होतोय त्रास -NNL


मालेगाव/ नांदेड|
राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होत आले आहे मालेगाव येथील गिरगाव चौक ते पोलीस चौकी पर्यंत दुभाजकामध्ये रस्ता सोडला नसल्यामुळे शिक्षक कॉलनी परिसरातील नागरिकांना दोन किलोमीटरचची फेरी मारून ये जा कराव लागत आहे.

सदर शिक्षक कॉलनी परिसरात दोन शाळा चार दवाखणे दोन मंदिर आहेत त्यामुळे नागरिकांची तसेच शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक कॉलनी परिसरात आहे राष्ट्रीय मार्ग महामार्गाचे काम करत असताना कंत्राटदाराने शिक्षक कॉलनी मध्ये जाण्यासाठी दुभाजकामध्ये रस्ता न ठेवल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे तसेच शालेय विद्यार्थांना फेरी मारून जावे लागत आहे. या मुळे  शालेय विद्यार्थांचा अपघात होण्याची ही शंका नाकारता येत नाही त्यामुळे ट्रामा केअर सेंटर समोर शिक्षक कॉलनी ला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

शिक्षक काॅलनी परीसरात जवळपास 2 हजारा लोकांची वस्ती आहे तसेच शाळा आहेत. परंतू दुभाजकाच्या मध्ये रस्ता सोडला नसल्यामुळे अनेक वाहनधारक चुकीचा बाजुने वाहने नेत आहेत तसेच शालेय विद्यार्थी ही चुकीच्या बाजुने येजा करत आहेत त्या मुळे शिक्षक काॅलनीच्या रस्त्यावर दुभाजकामध्ये रस्ता सोडावा. अशी प्रतिक्रिया राजेंद्र सुर्वे (रहवासी शिक्षक काॅलनी) यांनी दिली.

आम्हा सर्व रहवास्यांना याचा प्रचंड त्रास होतोय मालेगाव मध्ये यायचे असेल तर 2 कि.मी. पोलिस चौकी पासून फिरून यावे लागत आहे अन्यथा चुकीच्या बाजुने यावे लागत आहे. त्यामुळे अपघात होऊ शकतात. दुभाजकामध्ये शिक्षक काॅलनी साठी रस्ता सोडावा. अशी प्रतिक्रिया सुनील मिरजकर (रहवासी शिक्षक काॅलनी)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी