शेतीच्या नावावर व्यावसायिक वापर .... सैराट ट्रँक्टरांना आवरणार कोण ....? - NNL


हदगाव, शे चांदपाशा|
हदगाव शहरात व परिसरात काही ट्रक्टर चालक सैराट झाले असुन, शहरातुन भरधाव वेगाने धावत आहे. ट्रँक्टर चालविणा-याकडे कोणताही परवाना नसतो प्रशानाकडुन शेती वापराचे  वाहन म्हणून अनेक सवलती दिल्या जातात. विशेष म्हणजे काही ट्रक्टर मालक शहरी भागात ट्रक्टरचा व्यावसायिक म्हणुन वापर होताँना दिसुन येत आहे. काही अप्रशिक्षित ट्रँक्टर चालकामुळे  अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ट्रक्टर चालकांना वाहतुक नियमाचे ज्ञान नसल्याने रोडवर चालणा-या इतर वाहन चालकाचा जीव धोक्यात आलेल आहे. ट्रक्टर हे वाहन शेतीऊपयोगी वाहन म्हणून त्यावर कोणताही टँक्स आकरला जात नाही. ट्रक्टरचे फिटनेस ही १५ वर्षापर्यत तपासले जात नाही. व्यावसायिक वापरासाठी ट्रँक्टर घेतांना  शेताची सातबारा जोडुन टँक्स मध्ये सवलत घेतली जाते. ट्रँक्टरच्या ट्राली बाबतीत ही हीच पद्धत वापरली जाते. 

शहरात मालवाहतुकी करिता ट्रक्टरचा सर्रास वापर होतांना दिसुन येतो. रेती माती दगड गिट्टी गज विट करिता व तसेच बिल्डिंगच्या मटरियल करिता त्याचा वापर होतांना दिसुन येतो. इतकेच नव्हे शहरातील घणकचराही ट्रक्टर द्वरे वाहतूक केली जाते. आणखीन दुसरी गंभीर बाब म्हणजे  हे अप्रशिक्षित चालक ट्रक्टर घेवुन गर्दीच्या ठिकाणी रोडवर भरधाव वेगाने चालवत आहे. यामुळे अपघाताला मिळणारे एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. 

या बाबतीत मिळालेल्या माहीती नुसार या दोन वर्षात ९०% टक्के  पेक्षाजास्त महसुल विभागान या   ट्रँकटरवर प्रचंडप्रमा  ट्रालीला निययमाने इंडीकेटर. रिफ्पलेक्टर असणे अवश्यक आहे. या शिवाय ज्या व्यक्तीकडे लायसन्स आहे. या व्यक्तिनेच ट्रँक्टर चालवावा या बाबतीत सदर प्रतिनिधी ने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्याशी माञ संपर्क होऊ शकला नाही पण या बाबतीत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी या बाबतीत कार्यवाही करित नाही हे आवर्जून ऊल्लेख करावा लागेल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी