पिंपळकुंठा से.सो.निवडणुकीत पांडुरंग पाटील यांच्या गटाचा दणदणीत विजय...NNL

पांडुरंग पाटील यांच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी ग्रामविकास पॅनेलचे १३ पैकी १३ उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी


मुखेड, रणजित जामखेडकर।
मुखेड तालुक्यातील मौजे पिंपळकुंठा सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत पिंपळकुंठा ग्राम पंचायतीचे तरूण तडफदार,कार्यसम्राट सरपंच पांडुरंग पाटील यांच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी ग्रामविकास पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे.

मुखेड तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या मौजे पिंपळकुंठा सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक दि.०२ मे रोजी पार पडली या अतीतटीच्या निवडणुकीकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले होती. दोन्ही प्रतिस्पर्धी गटासाठी हि निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती.

सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत सुरूवातीला हि निवडणुक अत्यंत चुरशीची होईल असे वातावरण होते.मात्र गावातील मतदारांनी कार्यसम्राट सरपंच पांडुरंग पाटील यांच्या पॅनेलला प्रचंड कौल दिल्याने सर्वच १३ पैकी १३ उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजय झाले.

यामध्ये गोविंद बापुराव हिवराळे, माधव किशनराव वडजे, चंदर हरिबा जाधव,बाबु रत्न पवार, जयवंतराव मष्णा नालापल्ले, गंगाधर नारायण नालापल्ले, शिवाजी कामाजी जांभळे , तेजेराव भाऊराव गोपनर, साखरबाई विठ्ठल गोपनर, गंगाबाई बालाजी गोपनर, व्यंकटराल हुल्ला गोपनर, इजेलवाड केराबाई एकनाथ , समरथ शंकर घाटे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले ‌.

या विजयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी ग्रामविकास पॅनेलच्या विजयी उमेदवारांची जल्लोषात आतिषबाजी करून ढोल ताश्याच्या गजरात गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. या निवडीबद्दल तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख सरपंच पांडुरंग पाटील यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive