रेल्वे गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे तरूणाच्या जिवावर बेतले ; पाय कटुन निभावले -NNL


हिमायतनगर।
तालुक्यातील हदगाव रोड स्टेशनवर कृष्णा इंटरसिटी एक्सप्रेस गाडीतुन उतरलेला तरून परत गाडीत चढतांना दोन सिमेंट गट्टुच्या फटीत पाय अडकल्याने धावत्या रेल्वे खाली येवुन उजवा पाय टोंगळ्या पासुन कटला आहे हि घटना दि. १४ शनिवारी सायंकाळी साडे चार वाजेच्या दरम्यान घडली.


हदगाव रोड रेल्वे फलाटाचे काम मागिल वर्षा पासुन गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे रेंगाळलेले आहे, याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसत असुन दिवसा, रात्री उशीरा स्टेशनवर उतरलेल्या प्रवाशांना जीवावर बेतण्याचे प्रसंग ओढवत आहेत. कोरोना नंतर रेल्वे सुरू झाल्या पासुन रेल्वे फलाटावर किरकोळ अपघात वगळता पाय तुटण्याच्या मोडण्याच्या तीन घटना घडल्या तरी गुत्तेदाराच्या कामात सुधारणा झाली नाही.

दि. १४ शनिवारी किनवटच्या सरदार नगर भागातील शे. मुखीन शे. रहिम (वय २५) हा तरूण कृष्णा इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वेने नांदेड ते किनवट दरम्यान प्रवास करत होता, सदर रेल्वे हदगाव फलाटावर थांबताच हा तरूण पाणी पिण्यासाठी उतरला, परत रेल्वेत चढत होता, त्यावेळी रेल्वे फलाटाचे काम अर्धवट असलेल्या मोठ्या दोन गट्टुच्या फटीत त्याचा पाय अडकला, दरम्यान रेल्वे गती घेत असतांना तो रेल्वे खाली आला, याच वेळी त्याच्या उजव्या पायाचा चेंदामेंदा झाला, हि घटना दि. १४ शनिवारी सायंकाळी ४:२० मिनीटांनी घडली.

तरूणाचा जीव वाचवण्यासाठी सरपंच किशोर आदवाडे, अभिजीत देवसरकर, खासदार हेमंत पाटिल यांचे जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार यांनी घटनास्थळावर हजर होवुन प्रयत्न केले, जायमोक्यावरूनच किनवट येथिल सरदारनगरचे नगरसेवक अभय महाजन यांच्या माध्यमातुन नातेवाईकांना जख्मी तरूणा सोबत भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन बोलने करून दिले. तब्यती बद्दल माहिती दिली, येथे हजर असलेल्या स. इब्राहिम, स. मुबीन, काही तरूणांच्या मदतीने रूग्णवाहिकेत टाकुन उपचारार्थ पाठवले. अपघातग्रस्त रूग्णावर सध्या नांदेड येथे उपचार सुरू आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive