मुखेड येथे वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर।
मेवाडरत्न महान सुपुत्र,शूर योद्धा महाराणा प्रतापसिंह यांची ४८२ वी जयंती मुखेड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 

प्रारंभी महाराणा प्रतापसिंह यांच्या तैलचित्राचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष अशोकराव गजलवाड, भाजपा नेते व्यंकटराव लोहबंदे, नगरसेवक नासर पठाण, उत्तम बनसोडे, विनोद आडेपवार, सुधीर चव्हाण, विश्व हिंदू परिषदेचे मुखेड प्रखंड मंत्री महेश मुक्कावर, लोकमतचे पत्रकार शेखर पाटील, गणेश पाटील, अनिल शिरसे, भाजपा शहराध्यक्ष किशोरसिंह चौहान, माधवसिंह चौहान, युवानेते चरणसिंग चौहान, शंकरसिह कुवर, युवराजसिह चौहान, बाबुसिह ठाकुर, प्रतापसिह चौहन, शिवा समराळे, संदिप पाटील सलगरकर, अमरसिंह ठाकुर, करणी सेना तालुकाध्यक्ष चरणसिंह चौहान, बाबुसिंह ठाकुर, कैलाशसिंह चौहान, करणी सेना ग्रा.जि.अध्यक्ष  पृथ्वीराज चौहान, करणी सेना उपाध्याक्ष अध्यक्ष बबन सिंह, करणी सेना शहराध्यक्ष  मुकेश सिंह ठाकुर, कवलजितसिंह चौहान, पृथ्वीराज चौहान, चेतनसिंह चौहान,   बांधव उपस्थित होते.

 यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव गजलवाड म्हणाले की, महाराणा प्रतापसिंह यांचा आदर्श समाज बांधवांनी डोळ्यासमोर ठेवून कार्य केले पाहिजे. या महान योद्ध्यांनी समाजासाठी खूप काही केले आहे. त्यांची जयंती नुसती साजरी करून चालणार नाही तर त्यांचे विचार समाजबांधवांनी जनमानसात रुजविले पाहिजेत असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे शहराध्यक्ष किशोर चौहान यांनी केले तर चरणसिंह चौहान यांनी आभार मानले. यावेळी मान्यवरांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive