सामाजिक न्याय व सशक्तिकरण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दौरा -NNL


नांदेड।
 केंद्रीय सामाजिक न्याय  सशक्तिकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

शनिवार 21 मे 2022 रोजी हैद्राबाद येथून सकाळी 9.30 वा. नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.15 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दुपारी 2.45 वा. आमदार राजेश पवार यांच्या निवासस्थानी भेट. स्थळ भाग्यलक्ष्मी निवास शिवाजीनगर फुलेनगर नांदेड. दुपारी 3.30 वा. शिवाजीनगर नांदेड येथून लोहा तालुक्यातील पेनूरकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 4.30 वा. बुद्ध जयंती कार्यक्रमास पेनूर ता. लोहा येथे उपस्थिती. सायं 6  वा. पेनूर ता. लोहा येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. सायं. 7 वा. नारायण गायकवाड यांच्या कुटूंबियांची भेट स्थळ- इतवारा नांदेड. सायं 7.15 वा. नांदेड विश्रामगृह येथे आगमन. सायं 7.30 वा. डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे मेळाव्यास उपस्थिती. रात्री 9.30 वा. नांदेड विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

विवार 22 मे 2022 सकाळी 10 वा. जिल्हाधिकारीपोलीस अधिक्षक यांच्यासमवेत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे बैठकीस उपस्थिती. सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. सकाळी 11 वा. नांदेड येथून मोटारीने परभणीकडे प्रयाण करतील.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी