कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयात ईद मिलाप कार्यक्रम संपन्न -NNL


नांदेड|
देगलूर नाका येथील कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयात पवित्र रमजान महिन्यातील रोजे  पूर्ण झाल्यानंतर सामाजिक सौहदार्य वाढवण्यासाठी ईद साजरी करण्यात येते.हे औचित्य साधून सामाजिक सदभावना निर्माण होण्यासाठी कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयात "ईद मिलाप" कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी सहभाग नोंदवला यामध्ये नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे,एम आय एम माजी प्रदेशअध्यक्ष सय्यद मोईन ,नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे विद्यमान उपमहापौर अब्दुल गफार, माजी उपमहापौर मसुद खान, माजी उपमहापौर शमीम अब्दुल्ला, नगरसेवक सय्यद शोएब मजहर हुसैन, नगरसेवक फारुख बदवेल, नगरसेवक शेर अली, प्रा.डॉ डी. डी. पवार ,प्राचार्य डॉ  शेखर घुंगरवार, 

प्राचार्य डॉ. माळी सर, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे जुबेर अहमद, एमजेपी अध्यक्ष अल्ताफ हुसेन, अब्रार देशमुख मुक्ता राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद मोईन सौदागर, जावेद लुतफुल्ला, मुख्याध्यापक नदीम फराज, अथर हुसेन, इस्माईल जावीद, प्रा.डी. बी. जांभरुणकर, कांबळे, मुझफरुद्दीन, प्रा.कुरुंदकर,प्रा. विजय पवार, प्रा प्रमोद वाघमारे, प्रा.भीमराव घोडके, प्रा.चौष्टे, वजाहत उल्ला खान, मोहम्मद एजाज, तांबोली, विजय चित्ते, बशीर सर, धनवडे सर,पत्की सर,जाधव सर, परवेज खान बाबू खान, पत्रकार विकास गजभारे सोनकांबळे साहेब मुनव्वर खान आदींची उपस्थिती होती. 

कै. वसंतराव वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांना अल्पोपहार आणि शीरखुर्मा ची मेजवानी देण्यात आली अनेकांनी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले सामाजिक समानता प्रस्थापित होण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होणे आवश्यक आहे अशाही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. उपस्थित सर्व मान्यवरांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उस्मान गणी यांनी स्वागत करून आभार व्यक्त केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive