निहालसिंघ आणि गोपाल मेटकर यांनी नांदेडचे नावलौकिक केले -NNL

नगरसेवक गुरमीतसिंघ नवाब यांची प्रतिक्रिया; गोवा मध्ये सुरु आहे राष्ट्रीय स्पर्धा !


नांदेड।
सध्या देशपातळीवर 'खेलो इंडिया' अंतर्गत गोवा येथे सुरु असलेल्या सबजूनियर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राच्या हॉकी संघाचे सदस्य असलेले निहालसिंग चाहेल आणि गोपाल सायबू मेटकर यांचे उत्कृष्ट प्रदर्शन सुरु आहे. दोन्ही खेळाडू नांदेड च्या हॉकी नांदेड असोसिएशन तर्फे प्रशिक्षित आहेत. 

नांदेड हॉकीचे अध्यक्ष व नगरसेवक स. गुरमीतसिंघ नवाब (डिंपल सिंघ) यांच्या मार्गदर्शनात वरील दोन्ही खेळाडूंची निवड महाराष्ट्राच्या हॉकी चमूसाठी करण्यात आली. तसेच त्यांना गोवा येथे सूरु असलेल्या सबजूनियर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत संघातील मुख्य खेळाडू म्हणून स्थान प्राप्त झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार निहालसिंघ चाहेल आणि गोपाल मेटकर यांनी आपले सर्वोत्कृष्ट खेळ प्रदर्शन सुरु ठेवले आहेत. काल झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध असाम संघादरम्यान हॉकी सामना पार पडला. महाराष्ट्राने 3 विरुद्ध 1असा सामना जिंकला आहे. त्यात निहालसिंघ गज्जन सिंघ चाहेल आणि गोपाल सायबू मेटकर यांचा मोलाचा वाटा होता. 

वरील खेळाडूंना नांदेड येथील सुप्रसिद्ध हॉकी खेळाडू आणि हॉकी नांदेडचे अध्यक्ष स. गुरमीतसिंघ नवाब, सचिव हरविंदरसिंघ कपूर, जीतेन्द्रसिंघ खैरा, जसपाल सिंघ काहलो, महेंद्रसिंघ लांगरी, जसबीरसिंघ चीमा, महेंद्रसिंघ गाडीवाले, विजय कुमार नंदे, संदीपसिंघ अखबारवाले, हरप्रीतसिंघ लांगरी, अमरदीपसिंघ महाजन, सचिन कांबळे, राजू नागनूर, रामू गोडिंगम, प्रतापसिंग शाह, नवजोतसिंघ लांगरी, करणसिंघ, मोनिश करें आणि हॉकी खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर नगर सेवक गुरमीतसिंग नवाब यांनी वरील विषयी प्रतिक्रीयेत म्हंटल आहे की, निहालसिंघ चाहेल आणि गोपाल मेटकर हे सामान्य कुटुंबातून असून त्यांनी शालेय आवस्थेत मिळवलेले यश मोठे आहे. त्यांनी हॉकी खेळाद्वारे नांदेडचेही नावलौकिक केले आहे. इतर खेळाडूंपुढे त्यांचे आदर्श कारणीभूत ठरेल. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी