मराठी पत्रकार परिषदेच्या गंगाखेड मेळाव्याचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार -NNL


गंगाखेड।
मराठी पत्रकार परिषदेच्या गंगाखेड येथील पत्रकार मेळाव्याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत असून परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.. आयबीएन लोकमतचे न्यूज अँकर विलास बडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.. स्थानिक आ. रत्नाकर गुट्टे स्वागताध्यक्ष असतील अशी माहिती परिषदेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन यांनी दिली..यावेळी आ. सुरेश वरपूडकर, आ. मेघनाताई बोर्डीकर, आ. राहूल पाटील, राजेश विटेकर,परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, परिषदेच्या राज्य महिला संघटक जान्हवी पाटील मोहन फड आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.. 

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका अध्यक्षांचा मेळावा आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दिनांक 6 मे रोजी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे होत आहे.. यावेळी राज्यातील प्रत्येक विभागातून एक यानुसार आठ आदर्श तालुका संघांना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.. सकाळी दहा वाजता राजेश्वर फंक्शन हॉल, देवळे जिनिंग परिसर येथे  हा सोहळा संपन्न होत आहे.. 

राज्यभरातून किमान ५०० पत्रकार या मेळाव्यास उपस्थित राहतील अशी शक्यता आहे.. मेळावयानिमित्त एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यापुर्वी पाटण, नागपूर, वडवणी, पालघर, अक्कलकोट आदि ठिकाणी हा मेळावे झाले होते ..दोन सत्रात हा मेळावा होणार..आहे पहिल्या सत्रात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल आणि दुपारच्या सत्रात मराठी पत्रकार परिषदेची बैठक होईल.. बैठकीत परिषदेच्या चळवळीची पुढील दिशा नक्की करण्यात येईल.. यावेळी परिषदेचे पदाधिकारी मार्गदर्शन करतील.. मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे.. गंगाखेड या ऐतिहासिक नगरीत आणि पावन भूमीत प्रथमच राज्यातील पत्रकार मोठ्या संख्येने येत असल्याने गंगाखेड मध्ये देखील मोठा उत्साह आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच गंगाखेडला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.. कोषाध्यक्ष विजय जोशी,प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, उपाध्यक्ष सुरेश नाईकवाडे, कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे, आदिंचा यामध्ये समावेश होता.. परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागताध्यक्ष आ. रत्नाकर गुट्टे यांची भेट घेऊन त्याच्याशी चर्चा केली. मेळाव्यास पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन एस.एम देशमुख, परिषदेचे विभागीय सचिव प्रकाश कांबळे तसेच गंगाखेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पिराजी नामदेव कांबळे यांनी केले आहे..

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी