लेंडी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील दहा गावातील वाढीव कुंटुबांचे सर्वेक्षण -NNL

मुखेड, रणजित जामखेडकर।
जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांच्या आदेशावरुन लेंडी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील १० गावातील वाढीव कुंटुबांचे सर्वेक्षण सुरू आहे.पण मुक्रमाबाद येथील वाढीव कुटुंबाचे सर्वेक्षण होत नसल्याने प्रकल्पग्रस्तामध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. या विषयी जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मुक्रमाबाद प्रकल्पग्रस्तानी यापूर्वी च स्वेच्छा पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनानेकडे सादर केला असताना फक्त वाढीव कुटुंबाला इतर बाधीत गावा बरोबर लाभ देण्यात यावा. जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांच्या आदेशावरुन लेंडी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील दहा गावातील वाढीव कुंटुबांचे सर्वेक्षण सुरू आहे.पण मुक्रमाबाद येथील वाढीव कुटुंबाचे सर्वेक्षण होत नसल्याने प्रकल्पग्रस्तामध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. या विषयी जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथे गेल्या ३२ वर्षापासून अंतर राज्यीय लेंडी धरण होऊ घातले आहे.धरणाचे काम पुर्णत्वाकडे आले असतानाही शासनाच्या उदासीन धोरणामुळे धरणाचे काम रखडले आहे.धरणाच्या बुडीत क्षेत्रात १२ गावे बाधीत झाले असून यातील प्रलंबीत प्रश्न मार्गी लावून धरणाच्या कामास गती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांनी कंबर कसली आहे.भर उन्हात सर्व प्रशासनाला सोबत घेऊन बाधीत गावांना भेटी देऊन पुनर्वसनाची पाहणी करत प्रकल्पग्रस्ंच्या अडचणी जाणून घेत आहेत.       

दहा गावातील वाढीव कुटुंबाला स्वेच्छा पुनर्वसनाचा लाभ देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी एक परिपत्रक काढून लेंडी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील दहा गावातील वाढीव कुटंबाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.पण मुक्रमाबाद प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव कुटुंबाच्या स्वेच्छा पुनर्वसनाचा सध्या तरी सर्वेक्षण होत नसल्यामुळे संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. वाढीव कुटुंबाचे सर्वेक्षण व वाढीव कुटुंबाला स्वेच्छा पुनर्वसना लाभ मिळण्यासाठी वेळोवेळी शासन दरबारी मागणी करून देखील मुक्रमाबाद वासियांना न्याय मिळाला नाही. 

दहा गावातील वाढीव कुटुंब यादीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व हरकती तसेच लेखी म्हणणे देण्यासाठी ९ मे पर्यंत सर्व कागदपत्रे मुखेड तहसीलदार यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन केले आहे.ऐकीकडे वाढीव कुटुंब सर्वेक्षण सुरु आहे. तर जाणीवपूर्वक मुक्रमाबाद वाढीव कुटुंबाचे सर्वेक्षण का? होत नाही.अशा निर्णयामुळे प्रकल्पग्रस्ता मध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. जिल्हा प्रशासनाकडून मुक्रमाबाद वासियांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप केला जात आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी याविषयी जनतेत असलेले संभ्रम दूर करून मुक्रमाबाद वासीयांना न्याय मिळवून देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथे गेल्या ३२ वर्षापासून अंतर राज्यीय लेंडी धरण होऊ घातले आहे.धरणाचे काम पुर्णत्वाकडे आले. असतानाही शासनाच्या उदासीन धोरणामुळे धरणाचे काम रखडले आहे.धरणाच्या बुडीत क्षेत्रात १२ गावे बाधीत झाले असून यातील प्रलंबीत प्रश्न मार्गी लावून धरणाच्या कामास गती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांनी कंबर कसली आहे.भर उन्हात सर्व प्रशासनाला सोबत घेऊन बाधीत गावांना भेटी देऊन पुनर्वसनाची पाहणी करत प्रकल्पग्रस्ंच्या अडचणी जाणून घेत आहेत.       

दहा गावातील वाढीव कुटुंबाला स्वेच्छा पुनर्वसनाचा लाभ देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी एक परिपत्रक काढून लेंडी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील दहा गावातील वाढीव कुटंबाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.पण मुक्रमाबाद प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव कुटुंबाच्या स्वेच्छा पुनर्वसनाचा सध्या तरी सर्वेक्षण होत नसल्यामुळे संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. वाढीव कुटुंबाचे सर्वेक्षण व वाढीव कुटुंबाला स्वेच्छा पुनर्वसना लाभ मिळण्यासाठी वेळोवेळी शासन दरबारी मागणी करून देखील मुक्रमाबाद वासियांना न्याय मिळाला नाही. 

दहा गावातील वाढीव कुटुंब यादीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व हरकती तसेच लेखी म्हणणे देण्यासाठी ९ मे पर्यंत सर्व कागदपत्रे मुखेड तहसीलदार यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन केले आहे.ऐकीकडे वाढीव कुटुंब सर्वेक्षण सुरु आहे. तर जाणीवपूर्वक मुक्रमाबाद वाढीव कुटुंबाचे सर्वेक्षण का? होत नाही.अशा निर्णयामुळे प्रकल्पग्रस्ता मध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. जिल्हा प्रशासनाकडून मुक्रमाबाद वासियांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप केला जात आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी याविषयी जनतेत असलेले संभ्रम दूर करून मुक्रमाबाद वासीयांना न्याय मिळवून देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive