बिलोली तहसीलमध्ये महाराष्ट्र दिन साजरा , विधानपरिषद आ. राम पाटील रातोळीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण-NNL


बिलोली।
तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तहसील कार्यालय बिलोली मार्फत आयोजित महाराष्ट्राचा ६२ वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणा साठी विधानपरिषद आमदार राम पाटील रातोळीकर साहेब यांची उपस्थिती लाभली होती सर्व प्रथम तहसील कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


यावेळी ऊप विभागिय अधिकारी सचिन गिरी, तहसिलदार श्रीकांत निळे, नायब तहसीलदार रघुनाथ चव्हाण, निलावार परळीकर, मुख्याधिकारी अमोल चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागेश लखमावार, पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, यांच्या सह भारतीय जनता पार्टी बिलोली तालुका अध्यक्ष श्रीनिवास पाटील नरवाडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष इंद्रजित तुडमे, व्यंकटराव पाटील गुजरीकर, शांतेश्वर पाटील, आबाराव संगनोड, शंकरराव काळे, दत्तराम बोधने, विजय कुंचनवार, साईनाथ अरगूलवार, नागनाथ पाटील माचनुरकर, लक्षुमण भंडारे, सुर्यकांत पाटील शिंदे,मारोती राहीरे, बळवंत पाटील लुट्टे, यशवंत गादगे, भिमराव खांडेकर,दिलीप ऊत्तरवाड, शहराध्यक्ष राजकुमार गादगे, पत्रकार सय्यद रियाज,बाबु कुडके, साईनाथ शिरोळे, सामाजिक कार्यकर्ते प्रविण सुर्यवंशी,नरसिंग मेघमाळे यांच्यासह शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी