शिवा संघटनेमुळेच देशाच्या संसदेत म.बसवेश्वरांचा पुतळा -- प्रा.मनोहर धोंडे -NNL

देगलूर येथे म. बसवेश्वर यांची जयंती साजरी,ढोल ताशा,घोडे व रथासह भव्य मिरवणूक


देगलूर।
गल्ली ते दिल्ली पर्यंत महात्मा बसवेश्वरांच्या  कार्याची ओळख करून देत शासनाकडून शासकीय जयंती करण्यास भाग पडणारी संघटना म्हणजे शिवा संघटना होय. शिवा संघटना हि म.बसवेश्वरांच्या समता,मानवता,बंधुता या विचारधारांना घेऊन वीरशैव समाजातील तळागाळातील लोकांना ज्ञानवादी व विज्ञानवादी बनवण्यासाठी अहोरात्र झटत आहे. संघटनेच्या सततच्या पाठपुराव्या मुळेच देशाचे सर्वोच्च स्थान असणाऱ्या संसदेत महात्मा बसवेश्वरांचा पुतळा दिमाखाने स्थापित झाला आहे असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणात शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी देगलूर येथील म.बसवेश्वर जयंती निमित्त आयोजित समारोप कार्यक्रमात केले. 

काल बुधवार १८ मे रोजी देगलूर येथे शिवा संघटनेकडून जगत्ज्योती म . बसवेश्वर यांची  ८९१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील बंडयाप्पा  मठापासून सायंकाळी ५ वाजता आचार्य गुरुराज स्वामी अहमदपूरकर यांच्या हस्ते रथावर स्थापित महात्मा बसवेश्वरांच्या तैलचित्राचे विधिवत पूजन करून शोभायात्रेस सुरुवात करण्यात आली.यावेळी शिवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे, आमदार जितेश अंतापूरकर,माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार,माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार ,सुजित कांबळे,अशोक गंदपवार, अनंत पाटील खानापूरकर , डॉ.रवी काळे, कैलास येसगे ,सर्व नगरसेवक,अशोक मजगे,विश्वनाथ पाटील,संजय बिरादार,विजय आमटे,भीमराव वंटे, रुपेश पाटील ,सादिक मरखेलकर, आदी उपस्थित होते. 


ही शोभायात्रा बंडयाप्पा मठापासून गांधी चौक,नवीन सराफा लाईन येथून ढोल ताशांच्या गजरात ,टाळ मृदुंगाच्या सोबत गुरुराज माउलीच्या नामाचा व बसवेश्वरांच्या नावाचा जयघोष करत भजनी मंडळींच्या महिला-पुरुषांनी ठेका हे आकर्षणाचे केंद्र बनले होते. आचार्य गुरुराज स्वामी अहमदपूरकर हे रथामध्ये विराजित होते तर आमदार जितेश अंतापूरकर व नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार हे अश्वारूढ होते. हि शोभायात्रा महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ पोहोचल्यावर सर्व उपस्थितांनी म. बसवेश्वरांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करून मुख्य बाजारातून,लोहिया मैदान,पोलीस स्टेशन ते बंडयाप्पा मठामध्ये भव्य समारोप कार्यक्रमस्थळी विसर्जित झाली. 

सदरील समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. मनोहर धोंडे हे होते. कार्यक्रमास आचार्य गुरुराज स्वामी अहमदपूरकर,ष.ब्र. १०८ सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, तर  उदघाटक म्हणून आमदार जितेश अंतापूरकर,जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.मिनलताई खतगावकर,स्वागताध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार ,कार्याध्यक्ष बस्वराज पाटील,नांदेड चे जयंती उत्सव समिती नांदेड चे अध्यक्ष संतोष पांडागळे,जिल्हा संपर्क प्रमुख अनिल माळगे,देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहन माछरे ,संभाजी पाटील बुट्टे,वीरभद्र बसापुरे,दिगंबर पाटील,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शिवानंद स्वामी,रुपेश पाटील ,बन्सी पाटील,पंडितराव पाटील,गजानन पाटील,नंदाताई पाटील,नंदाताई देशमुख,अनंत पाटील खानापूरकर आदी उपस्थित होते. 

समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण शिवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे यांनी केले. आपल्या प्रात्साविक भाषणातून त्यांनी शिवा संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत झालेल्या कार्याची माहिती सांगितली. त्यानंतर नांदेड उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष पांडागळे यांनी ओबीसी आरक्षणावर कशाप्रकारे घाला घालण्याचे कार्य केले जात आहे यावर मत मांडले. 

जयंती उत्सव समिती देगलूर चे अध्यक्ष डॉ. मिनलताई पाटील खतगावकर यांनी महात्मा बसवेश्वरांच्या जीवनचरित्राचा २३ भाषांमधून पुस्तके असल्याने सामान्य माणसाला म. बसवेश्वरांचा जीवनकार्य ,त्यांचा अनुभव मंटप सामान्य माणसाला कळत आहे,त्यामुळे त्यांच्या विचारातून मिळालेली ऊर्जा हि समाजासाठी उपयोगी आहे असे त्या म्हणाले. 

आमदार जितेश अंतापूरकर यांनी आपल्या भाषणात ते स्वतः शिवा संघटनेचे सदस्य असल्याचे सांगत त्यांच्या आमदारकीच्या विजयात शिवा संघटनेचा मोलाचा वाट आहे असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात प्रा. धोंडे यांनी वीरशैव लिंगायत समाजातील २१ उपजातींना ओबीसी आरक्षण शिव संघटनेने मिळवून दिल्याचे सांगत उर्वरित ३२ उपजातींना ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ पाटील यांनी केले तर आभार विजय आमटे यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

म . बसवेश्वर यांच्या ८९१ व्या  जयंती निमित्त आयोजित शोभायात्रा व समारोप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवा  संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोकराव मजगे,विश्वनाथ पाटील,संजय बिरादार ,रामलिंग स्वामी,दत्ता चैनपुरे,प्रकाश पाटील,घालप्पा आंबेसंगे ,हणमंतराव भवरे,वर्षाताई देशमुख,ससुरेखा देवाडे ,लहुकुमार मरतोळे,अशोक पाटील बळेगावकर,सुभाष पाटील हावरगेकर,अंकुश साखरे,अशोक जुबरे ,बसवंत हळदे,विजय आमटे, नागनाथ चलमले , ओमप्रकाश बावगे,प्रकाश हेड्डे,विश्वनाथ गडगे ,वीरभद्र चैनपुरे,अशोक धर्माजे ,संतोष ह्सगुंडे,गंगाधर द्याडे ,सुनील चमकुरे ,संजय तोणसुरे ,रुपेश पाटील संदीप पाटील ,श्रीकांत आरसेवार,शिवदास मजगे आदींनी परिश्रम केले .   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी