महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार रोटरी पुरस्काराने सन्मानित -NNL


लातूर|
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांना सर्वोच्च रोटरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 लातूर येथील दयानंद कॉलेजमध्ये झालेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 च्या चौदाव्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स उत्सव  कार्यक्रमात नंदकुमार गादेवार यांना पंतप्रधान कार्यालयातील सल्लागार व  माजी राजदूत  डॉ. दीपक होरा (आय एफ एस) यांच्या हस्ते व अॅड गजेंद्रसिंग धामा, रोटरीचे गव्हर्नर डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, महेंद्र खंडागळे यांच्या सह प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या समक्ष सर्वोच्च रोटरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या माध्यमातून महासभेचे अध्यक्ष नंदकुमार दत्तात्रय गादेवार यांनी केलेल्या कार्याचा आढावा याप्रसंगी घेण्यात आला सामाजिक शैक्षणिक धार्मिक हित डोळ्यासमोर ठेवून रोटरीने हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

या प्रसंगी महासभेचे सचिव गोविंदराव बिडवई, कोषाध्यक्ष सुभाषराव कन्नावार, बांधकाम समितीचे सभापती भानुदास वट्टमवार, एकनाथराव मामडे संघटनप्रमुख प्रदीप कोकडवार, राज्य प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार, सुरेश पेन्शलवार, बालाजी पेन्शलवार, दीपक कोटलवार, अनिरुद्ध राजूरकर, माणिक बट्टेवार, सौ  अंजली कोटलवार, मनीष मानिकवार, वैभव झरकर, महेश पत्तेवार, अजय गादेवार, चंद्रकांत गुंडाळे, व्यंकटेश गादेवार आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते,अशी माहिती लातूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अविनाश बट्टेवार यांनी दिली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी