नांदेड येथे नोंदणीकृत फ्रुट असोसिएशन नांदेड ची स्थापना -NNL


नांदेड|
कामठा माळ टेकडी परिसरात असलेल्या घाऊक फळ विक्रेत्यांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्त नांदेड विभागीय कार्यालयामध्ये नोंदणीकृत फ्रूट असोसिएशन नांदेड ची स्थापना केली आहे. नांदेड येथे सर्वात मोठी फळांची खरेदी विक्री होत असलेल्या फ्रुट मार्केट च्या कामकाजामध्ये अधिक सुसूत्रता व नियमितता यावी यासाठी 'फ्रूट असोसिएशन नांदेड' ची स्थापना करण्यात आली आहे.

यामध्ये अध्यक्ष म्हणून अब्दुल हबीब अब्दुल रहीम बागवान यांची निवड करण्यात आली आहे तर मोहमद अकबर चांद साहब यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे तसेच अब्दुल गफार अब्दुल रजाक हे सचिव म्हणून काम पाहतील तर कोषाध्यक्ष म्हणून अब्दुल हकीम अब्दुल वाहिद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. महासचिव म्हणून अब्दुल राऊफ मोहम्मद हसनजी यांची निवड झाली आहे.

 सदस्य म्हणून मोहम्मद अब्दुल मतीन अब्दुल वाहिद, मोहम्मद फहीम खान अब्दुल लतीफ़ खान,  अब्दुल मुनीर अब्दुल रहीम, मोहम्मद सुलतान मोहम्मद अनवर,  मोहम्मद उस्मान मोहम्मद मन्नान, महंमद रफिक अब्दुल गफार, अब्दुल रफीक मोहम्मद हाकिम, मोहम्मद आसिफ मोहम्मद आरिफ, अब्दुल युनुस अमजद खान शफी खान शेख ताजुद्दीन शेख जानी भाई शेख इमरान शेख ताजुद्दीन मोहमह रफीक यांची निवड करण्यात आली. सदरील निवडीबद्दल आणि धर्मादाय आयुक्त कार्यालय नांदेड मध्ये नोंदणी झाल्याबद्दल समस्त बागवान समुदायात तर्फे कार्यकारिणीच्या पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. आणि भावी काळात फळ विक्रेत्या व्यावसायिकांच्या समस्या सोडवून व्यवहार एकदम सुटसुटीत पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी