वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिणचा वतीने महामानवाच्या विचारांचा जागर महोत्सव -NNL

संगीत सम्राट फेम अजय देहाडे यांच्या गिताचा कार्यक्रम.


नविन नांदेड।
स्वाभिमानी नेते अँड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त व ईद मिलनाचा निमित्ताने वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिणचा वतीने प्रकाश पर्व महामानवाच्या  विचारांचा जागर महोत्सव अंतर्गत झी युवा संगीत सम्राट फेम अजय देहाडे यांच्या  प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन 20मे रोजी  सायंकाळी 5 वाजताजेतवन बुद्ध विहार मैदान गुरूवार बाजार सिडको येथे आयोजित केला आहे.

 या कार्यक्रमाचे ऊधदाघाटक प्रदेश प्रवक्ते फारूक अहेमद,तर अध्यक्षस्थानी सुभाष डोगंरे, व प्रमुख पाहुणे म्हणून गोविंद दळवी, नागोराव पांचाळ, डॉ. संघरतत्न कुरहे ,शिवाभाऊ नंरगले, पि.एम. वाघमारे,शाम कांबळे,दैवशाला पांचाळ,निरंजनताई आवटे,आयुब खान, विनायक गजभारे, कैलास वाघमारे,चंद्रकलाताई चापलकर, जयप्रकाश लांडगे राहुल सोनसळे यांच्या सह मान्यवरांच्यी ऊपसिथीती राहणार आहे.

झि युवा संगीत सम्राट फेम ,काळजावर कोरले नांव आमच्या भीमा कोरेगाव फेम अजय देहाडे यांच्या प्रबोधनात्मक गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक तथा महानगर  दक्षिण अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, संयोजन समिती कार्याध्यक्ष सुदर्शन कांचनगिरे, स्वागत अध्यक्ष म्हणून श्याम नायगावे तर संयोजन समितीचे अध्यक्ष अमृत नंरगलकर, व आयोजक समिती पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी