आता सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी/नुतनीकरण ऑनलाईन होणार -NNL

पीसीपीएनडीटी वेबपोर्टलमुळे पारदर्शकता येणार - आरोग्य मंत्री राजेश टोपे

 


मुंबई
 प्रसुतीपूर्व गर्भलिंगनिदान (पीसीपीएनडीटी)च्या ऑनलाईन वेबपोर्टलमुळे सोनोग्राफी केंद्रांच्या नोंदणी/ नुतनीकरण प्रक्रियेत गतिमानता आणि पारदर्शकता येणार आहे. या ऑनलाईन सुविधेमुळे केंद्र धारकांना कार्यालतील हेलपाटेअनावश्यक वेळ आणि खर्चापासून दिलासा मिळणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
मुंबईतील कुपरेज येथे स्थित महाराष्ट्र राज्य नाविन्‍यता सोसायटीच्या कार्यालयात आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्या हस्ते पीसीपीएनडीटीच्या ऑनलाईन वेबपोर्टलचे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यासआरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामीसंचालक डॉ. अर्चना पाटीलसर्व आरोग्य उपसंचालकजिल्हा शल्य चिकित्सकआरोग्य अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

            

आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे म्हणाले कीराज्यात मुलांमुलींची संख्या समान राहावी यासाठी राज्य शासन प्रसुतीपूर्व गर्भलिंगनिदान (पीसीपीएनडीटी) कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करीत आहे. महाआयटीच्या सहकार्याने चांगले उपक्रम राबविले जात आहेत. राज्यातील सोनोग्राफी केंद्रांच्या नोंदणी/ नुतनीकरणासाठी आरोग्य विभागाने ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. ज्यांना नोंदणी किंवा नुतनीकरण करावयाचे आहे अशांनी या ऑनलाईन सुविधेचा वापर करावा. या सुविधेमुळे केंद्र धारकांना कार्यालयातील हेलपाटेअनावश्यक वेळ आणि खर्चापासून दिलासा मिळणार आहे. त्यासोबत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास मदत होणार आहे. या ऑनलाईन सुविधेचा चांगला उपयोग करून केंद्रांच्या नोंदणी आणि नुतनीकरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहेअसेही श्री. टोपे यांनी सांगितले.

            

ही नवीन प्रणाली विकसीत केल्याबद्दल आरोग्य आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले कीया वेबपोर्टलद्वारे नोंदणी/नुतनीकरण प्रक्रियेवर देखरेख केली जाणार आहे. आरोग्य क्षेत्रात उपयुक्त ठरतील असे नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य विभागाशी संबंधित इतर सेवा एका प्लॅटफॅार्मवर याव्यात यासाठी एकत्रितपणे काम करणार असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ या कार्यक्रमांतर्गत पीसीपीएनडीटी कायद्यानुसार केंद्राची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी/नुतनीकरण करण्यासाठी कार्यप्रणाली विकसीत करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार पीसीपीएनडीटी कायद्यांअंतर्गत केंद्राची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी/ नुतनीकरणासाठी http://pcpndtonlineregistration.maharashtra.gov.in ही कार्यप्रणाली महाऑनलाईन (महा-आयटी) या संस्थेच्या मदतीने विकसीत करण्यात आलेली आहेअशी माहिती यावेळी देण्यात आली.


राज्यातील पहिली शासकीय नवजात शिशु रूग्णवाहिका सेवेत दाखल

आदिवासी भागातील बाल मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने नवजात शिशुंना संदर्भसेवा देताना  अद्यावत आरोग्य सुविधा पुरविणारी आरोग्य विभागाची राज्यातील पहिली नवजात शिशु रूग्णवाहिका सेवेत दाखल झाली आहे. या रूग्णवाहिकेचे लोकार्पण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज मुंबईत झाले. सर्व साधनसामुग्रीअद्यावत उपकरणे आणि सुविधांनी सज्ज असलेली रूग्णवाहिका राज्यातील आदिवासी भागातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगावअमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा आणि नाशिक जिल्ह्यातील पेठ या आदिवासी भागातील शासकीय रुग्णालयांत दाखल होणार आहेत.


रुग्णवाहिकेचे फायदे - रुग्णवाहिकेमार्फत नवजात बालकांना संदर्भसेवा देत असताना योग्‍य उपचार सुरु ठेवून इतर आरोग्य संस्थेमध्ये संदर्भित करेपर्यंत शिशुचे आरोग्य स्थिर राखण्यास मदत होईल. कमी वजनाचीकमी दिवसाची बालकेनवजात शिशुंमधील श्वसनाचे व फुफ्फुसाचे आजारसेप्सीसन्यूमोनियाजलशुष्कताहायपोथर्मियाजंतूसंसर्ग यासारख्या गंभीर आजारांच्‍या रुग्‍णांना संदर्भीत करताना याचा उपयोग होणार असून त्‍यामुळे मृत्यु टाळण्यासाठी मदत होणार आहे. नवजात शिशुला संदर्भ सेवा देताना कांगारु मदर केअर (केएमसी) या सारख्या उपचार पद्धतीचा उपयोग करुन शिशुचे आरोग्य स्थिर राखण्यास मदत होईल. नवजात शिशु रुग्णवाहिकेमध्ये Transport Baby Warmer/ Kangaroo Bag उपलब्ध असल्याने Hypothermia मुळे होणाऱ्या अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. नवजात शिशु रुग्णवाहिकेमध्ये Suction Machine, AMBU Bag, Oxygen Hood, Cylinder, Continuous Positive Airway Pressure (CPAP) यासाखी यंत्रसामग्री व उपकरणेऔषधसाठा व प्रक्षिशीत मनुष्यबळ असल्याने संदर्भीत होताना होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.


कार्यपद्धती - या नवजात शिशु रुग्णवाहिका आदिवासी जिल्ह्यातील तालुक्याच्या उप जिल्हा रुग्णालय / ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी कार्यरत असतील. सद्यस्थितीत जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा यासाठी वापर करण्यात येईल. तसेच या नवजात शिशु रुग्‍णवाहिकेसाठी २०२२-२३ मध्ये १५ वैद्यकीय अधिकारी व १० वाहन चालकांच्या पदाची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आलेली आहे. नवजात शिशुंसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व वाहन चालकांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यक्षेत्रामधून कॉल आल्यास नवजात शिशु रुग्णवाहिकेमार्फत संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहे. त्याकरिता १०२/१०८ या टोल फ्री नंबरचा उपयोग करण्यात येईल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी