यंदाची आषाढी वारी एसटी आपल्या दारी..कंधार आगाराची नवीन संकल्पना -NNL

45 प्रवाशी ( नागरीक) समूह असेल तर थेट गावातून पंढरपूर वारी


उस्माननगर, माणिक भिसे।
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय व जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभाग कंधार आगाराच्या वतीने यंदा लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी थेट गावातून पंढरपूरला जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी गावात ४५  प्रवाशांचा (नागरिकांचा) समूह असेल तर थेट गावातून पंढरपूरला वारी जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध व बुकिंग करण्यात सुविधा करण्यात आली आहे. अशी माहिती कंधार आगाराचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी माहिती दिली.

मागील दोन वर्षापासून कोरोना या संसर्गजन्य रोगापासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रद्धास्थान विठुरायाच्या दर्शनापासून भाविकांना व यात्रेकरूंना दूर राहावे लागले. दोन वर्षाच्या कालावधीनंतर भाविकांना  विठुरायाच्या दर्शन खुले दर्शन मिळणार त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सुद्धा यात्रेकरू व भाविकासाठी बसेसची व्यवस्था सुरु केली कंधार आगारातून 36 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. दिनांक 4 जुलै ते 15 दरम्यान पंढरपूर यात्रा स्पेशल बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उत्पन्न पंढरपूर यात्रेतून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मिळत असते यासाठीसुद्धा यात्रेकरू व भाविकांसाठी सुविधा करण्यात आले आहे.

यावेळी कंधार आगाराने तर यात्रेकरू व भाविकासाठी ग्रुप तिथे पंढरपूर बस सेवा या नव्या पद्धतीने सोय करण्यात आली आहे. गावातील व ग्रामपंचायत तेथून 45 भाविकांचा ग्रुप पंढरपूर दर्शनासाठी जाण्यास तयार असेल तर त्या गावातूनच थेट भाविकांना घेऊन जाण्याची व्यवस्था आगाराच्या वतीने सोय करण्यात आली आहे यासाठी कंधार आगाराचे आगार प्रमुख अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली आहे. हे यात्रेकरू व भाविकांच्या सुविधा यात्रेमध्ये आगाराचे उत्पन्न व भाविकांची सोई यासाठी बैठक घेण्यात आली होती.

 तालुक्यातील यात्री करू व भाविकांच्या दर्शनासाठी उपायोजना बैठक घेऊन यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आगार प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या यात्रेमध्ये स्थानक प्रमुख जगदीश मटंगे सहाय्यक वाहतूक निरीक्षक कोंडीबा केंद्रे वरिष्ठ लिपिक चंद्रकांत श्रीमंगले ज्ञानेश्वर केंद्रे ज्ञानेश्वर कोंडा मंगले लिपिक संभाजी मठपती गोविंद शिंदे आशिष जोगे यांच्याशी संपर्क साधावे व थेट आपल्या गावात पंढरपूर दर्शनासाठी 45 भाविकाचा समूह तयार करून पंढरपूर दर्शन करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच यासाठी पाळी प्रमुख आर पी जायभाय जी डी गोणारे बी एस गिते सय्यद वाजिद  वाहन परीक्षक एस पी वाघमारे एम डी केंद्रे सह यांञिक कर्मचारी,चालक ,वाहक परिश्रम घेत आहेत

दोन वर्षाच्या नंतर पंढरपूर यात्रेकरू व भाविकांसाठी थेट आपल्या गावातून विठुरायाच्या दर्शनासाठी कंधार आगाराने पंढरपूर दर्शनासाठी जाण्यास तयार असेल अशा  45 भावीकाने  चा ग्रुप तयार तर त्यांना थेट आपल्या गावातून पंढरपूर साठी बस सेवेचे नियोजन केले हे नियोजन नागरिकांसाठी केले आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन अशोक चव्हाण, आगार व्यवस्थापक, कंधार आगार

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी