हिवताप विभागाची राज्यस्तरीय आढावा बैठक वेरूळ येथे संपन्न -NNL


औरंगाबाद।
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राज्यस्तरीय आढावा बैठक आज दि. २० जून रोजी वेरूळ जि.औरंगाबाद येथे औरंगाबाद, लातूर, अकोला व नागपूर विभागातील सहाय्यक संचालक आरोग्य (सेवा) हिवताप, जिल्हा हिवताप अधिकारी, हत्तीरोग अधिकारी, जिवशास्रज्ञ, मनपा आरोग्य अधिकारी यांची राज्यस्तरीय आढावा बैठक डॉ स्वप्निल लाळे, सह संचालक आरोग्य सेवा ( हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग) पुणे यांच्या संकल्पनेतून प्रथमच पुणे शहरा बाहेर राज्यस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली. 

सध्या पावसाळ्याचे दिवस असून किटकजन्य आजाराचे रुग्ण वाढणार नाहीत या बाबत नियोजन व उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ राजेंद्रकुमार सिंह राज्यस्तरीय समन्वयक युनिसेफ एनडीडी यांनी हत्तीरोग विभागाची राज्यस्तरीय परिस्थिती दाखवली व मार्गदर्शन केले. डॉ कमलापुरकर मँडम सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हत्तीरोग) पुणे यांनी हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू व चिकुनगुनिया आजाराची सविस्तर आढावा घेतला व मार्गदर्शन केले. मार्च २०२३ पर्यंत अंडवृद्धी शस्रक्रिया  महाराष्ट्र मुक्त करण्याचे नियोजन करण्याविषयी मार्गदर्शन केले. 


किटकशास्रीय सर्वेक्षण बाबत माहिती व उपाययोजना याची सविस्तर माहिती डॉ महेंद्र जगताप राज्य किटकशास्रज्ञ पुणे यांनी दिली. श्री अंकुशे राज्य शास्त्र यांनी डासा मधील रजिस्टनस बद्दल सविस्तर माहिती दिली. डॉ घोलप सहाय्यक संचालक  आरोग्य सेवा (हिवताप) औरंगाबाद व त्यांच्या टिमने सुयोग्य असे नियोजन कल्या बद्दल त्यांच्या सत्कार केला. 

यावेळी डॉ गहीलोत मँडम उपसंचालक आरोग्य सेवा औरंगाबाद, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) डॉ. संजय ढगे लातूर, डॉ भंडारी अकोला, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ आकाश देशमुख नांदेड, डॉ शेख रहिम लातूर, डॉ मधुकर पांचाळ उस्मानाबाद, डॉ कुणाल मोडक गडचिरोली, डॉ रवि ढोले औरंगाबाद, डॉ गणेश जोगदंड हिंगोली, डॉ राहुल राऊत जालना, डॉ सय्यद अकोला, श्रीमती चारमोडे मँडम, सत्यजीत टिप्रेसवार नांदेड, राऊत, ठोंबरे, रवि इरनाळे, मोतीयळे, विष्णु आघाव, रविराज खंडागळे, अविनाश अटकोरे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive
nandednewslive