अखेर मुद्रांक,जमीन घोटाळा व बोगस दस्त नोंदणी प्रकरणात अनेक अधिकारी कर्मचारी निलंबित होणार -NNL

(मुद्रांक जिल्हाधिकार्‍यांनी दिले कॉ.गंगाधर गायकवाड यांना लेखी पत्र)


नांदेड|
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव तथा " द हिंदू " राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्रासाठी चांगला प्रेस मिळविलेले कार्यकर्ते कॉ.गंगाधर गायकवाड यांनी अभ्यासपूर्ण व सखोल शोध मोहिमेतून दि.१० सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री, मुख्य सचिव, महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे, जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्यासह माकपचे आमदार कॉ.विनोद निकोले यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज देऊन नांदेड जिल्ह्यातील दस्त नोंदणी, मुद्रांक व जमीन घोटाळ्यातील संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

ही मागणी घेऊन माकपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक आंदोलने ही केली आहेत. शेवटचे आंदोलन म्हणजे अमरण उपोषण कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दि.३० मे २०२२ ते १ जून २०२२ असे तीन दिवस जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर केले आहे. त्या उपोषणात मागील तीन वर्षात झालेल्या बोगस दस्त नोंदणी, तुकडे पाड कायद्याचे उल्लंघन व मुद्रांक घोटाळ्याची चौकशी करून कार्यवाही करावी ही मूळ मागणी कायम लावून धरण्यात आली होती.तसेच जिल्ह्यातील बोगस दस्त नोंदणी, मुद्रांक आणि जमीन घोटाळा उघड झाला असून संबंधित मुद्रांक दुय्यम निबंधक व सहनिबंधक व इतरावर कारवाई करून निलंबित करणे ही प्रमुख मागणी करण्यात आली होती.

परंतु जिल्हाधिकारी नांदेड यांनी नोव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२१ हा तपासणी कालावधी निश्चित केला आहे असे मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे म्हणणे आहे.पत्र जा.क्र.२०२२/तप्र/उपोषण माहिती /४६६४-६४ द्वारे दिनांक १६ जून २०२२ रोजी कॉ.गंगाधर गायकवाड यांना रजिस्टर पोस्टाने निर्गमित केलेल्या पत्रात सुस्पष्ट शब्दात श्री.वि.प्र.बोराळकर सह जिल्हा निबंधक वर्ग - १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नांदेड यांनी असे लिहिले आहे की, नोंदणी झालेल्या एकूण १०५ दस्ता सोबत बनावट कागदपत्रे जोडण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच या प्रकरणात गुन्हे दाखल कारण्यात आले आहेत. सह दुय्यम निबंधक वर्ग - २ कार्यालय नांदेड क्र.१: सह नियम निबंधक वर्ग-२ कार्यालय नांदेड क्र.१ चे कार्यभार सांभाळत असताना खालील अनुक्रमे एक व दोन दुय्यम निबंधक श्रेणी-१ यांनी दस्त नोंदणी करताना समितीने नेमलेल्या पथकाने सादर केलेल्या अहवालातील नमूद दस्तांच्या नोंदणीमध्ये अनियमितता झालेली आहे. 

श्री एन.आर. बोधणे यांनी एकूण ३ प्रकरणात तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून दस्तऐवजांची नोंदणी केली असल्याचा समितीने आक्षेप घेतला आहे.श्री. बि. एस. उतरवार यांनी एका प्रकरणात तुकडेबंदी कायद्याचे उल्लंन तसेच विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता एकूण ४ दस्तऐवजांची नोंदणी केली आहे. सहदुय्यम निबंधक वर्ग -२ कार्यालय नांदेड क्र.१ या पदाचा प्रभारी कार्यभार स्वीकारलेले कनिष्ठ लिपिक श्री. जी.एम. गडगिळे यांनी तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून एकूण ३९  प्रकरणात दस्तऐवजांची नोंदणी केली असल्याचा समितीने आक्षेप घेतला आहे. तसेच विहित कार्य पद्धतीचा अवलंब न करता एकूण ४६ दस्तऐवजांची नोंदणी केली आहे. असा समितीने आक्षेप घेतला आहे. कनिष्ठ लिपिक श्री c.s.r. नाकाडे यांनी तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून एकूण ७ प्रकरणात दस्तऐवजांची नोंदणी केली असल्याचा समितीने आक्षेप घेतला आहे. तसेच विहीत कार्यपद्धतीचा अवलंब न करता एक दस्तऐवजांची नोंदणी केली आहे. 

कार्यालय नांदेड क्र. २ या पदाचा प्रभारी कार्यभार स्वीकारलेले वरिष्ठ लिपिक श्रीम. एफ. एम. शेख यांनी तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून एक प्रकरणात दस्तऐवजांची नोंदणी केली असल्याचा समितीने आक्षेप घेतला आहे. तसेच विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता एकूण २ दस्तऐवजांची नोंदणी केली आहे. असा समितीचा आक्षेप आहे. सह दुय्यम निबंधक वर्ग -२ कार्यालय नांदेड क्रमांक २ पदाचा प्रभारी कार्यभार स्वीकारलेले कनिष्ठ लिपिक श्रीम. सी. पी. बनसोड ज्यांनी तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून १ प्रकरणात दस्तऐवजांची नोंदणी केली आहे तसेच विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता २ दस्तऐवजांची नोंदणी केली आहे असा समितीने आक्षेप घेतला आहे. दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालय नांदेड क्र.३ पदाचा प्रभारी कार्यभार स्वीकारलेले वरिष्ठ लिपिक श्रीम.एम.व्ही.सुस्ते यांनी तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन करून एकूण ११ प्रकरणात दस्तऐवजांची नोंदणी केली असल्याचा समितीने आक्षेप घेतला आहे. तसेच विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता एकूण २३ दस्तऐवजांची नोंदणी केली आहे असा समितीने आक्षेप घेतला आहे. 

दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालय नांदेड क्र. ३या पदाचा प्रभारी कार्यभार स्वीकारलेले कनिष्ठ लिपिक श्री.एस.पी. रहाटकर यांनी विहीत कार्य पद्धतीचा अवलंब न करता एकूण १ दस्तऐवजांची नोंदणी केली आहे असा समितीने आक्षेप घेतला आहे. वर नमूद अनुक्रमे एक ते आठ सह दुय्यम निबंधक वर्ग 2 कार्यालय नांदेड क्रमांक एक व दोन तसेच जीएम निबंधक श्रेणी-1 कार्यालय नांदेड चीन या पदाचा कार्यभार स्वीकारलेले दुय्यम निबंधक श्रेणी-1 तसेच वरिष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक यांना या कार्यालयाने समितीच्या अहवालातील घेतलेल्या क्षेत्राबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे याबाबतचा त्यांच्याकडून लेखी खुलासा प्राप्त होतात. त्यावर ते दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करणे बाबत तो नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक लातूर विभाग यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल. 

समितीने उघडकीस आणलेल्या एकूण १०५ प्रकरणात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. असे लेखी कॉ.गंगाधर गायकवाड यांना श्री.वि.प्र. बोराळकर सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविण्यात आले आहे.  मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रानुसार कारवाई झाली नाही तर आणखी तीtव्र6 आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती माकप सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी