खाजगी ट्रव्हलसने युवकाला उडविले ; जागीच मृत्यू -NNL


हदगाव, शे चांदपाशा|
नादेड - नागपुर या राष्ट्रीय महामार्गाचे काम झाल्यानंतर वाहनांची गती वाढली आहे. असेच भरधाव वेगात जाणाऱ्या एका खाजगी ट्राईव्हल्सने दुचाकीवरून गवई जाणाऱ्या युवकास जबर धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.  

नादेड नागपुर या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगात वाहने जात आहेत. या रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट असताना ठिकठिकाणी सूचना फलक नसल्याने वाहनचालक बेफिकीरपणा वाहने चालवीत आहेत. काल रात्रीला मनाठा पोलिस स्टेशन अतर्गत येणाऱ्या शिबदरा या गावाजवळ राञी ८ वाजे दरम्यान नादेडहुन हदगाव कडे येणा-या एका खाजगी ट्रव्हलसने मोटार सायकल वरन आपल्या गावाकडे जाणाऱ्या राजू बळीराम आडे (बामणी तांडा ) येथील रहवाशी असलेलल्या युवकाला उडविले आहे. खाजगी ट्रव्हल्सच्या जबर धडकने युवकाचा सीएंट काँक्रेटच्या रस्त्यावर पडून अतिरक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी