घराघरात श्रावण बाळ तयार झाल्यास ठीक -ठिकाणी वृद्धाश्रम काढण्याची गरज नाही. -मुंडकर -NNL


नांदेड।
घराघरात श्रावण बाळ तयार झाल्यास ठीक- ठिकाणी वृद्धाश्रम काढण्याची गरज पडणार नाही. असे प्रतिपादन बिलोली शहर विकास कृती समितीचे अध्यक्ष गोविंद मुंडकर यांनी केले. ते सेवानिवृत्त निबंधक अधिकारी तथा बिलोली चे ज्येष्ठ नागरिक वैजनाथराव मेघमाळे यांच्या विवाहाचा 50 व्या वाढदिवसानिमित्त  बजाज फंक्शन हॉल नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे संयोजन नांदेड जिल्हा परिषदेचे भूतपूर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा विद्यमान नागपूर म्हाडाचे मुख्य अधिकारी  महेशकुमार मेघमाळे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे,प्रसिद्ध कलाकार दिलीप खंडेराय , माजी उपाध्यक्ष मारुती पटाईत , डॉ केंचे आदींची उपस्थिती होती.

मुंडकर पुढे म्हणाले की, ठिकठिकाणी वृद्धाश्रम निर्माण होत आहेत. त्याला आधुनिक संस्कार -संस्कृती आणि जीवन पद्धती कारणीभूत आहे. उच्चपदस्थ अधिकारी कामाच्याव्यापात आणि अधिकाराच्या तोऱ्यात आपल्या माता-पिता कडे कानाडोळा करतात. श्रीयुत वैजनाथराव मेघमाळे यांच्या या कार्यक्रमातून आई-वडिलांचा आदर करण्याची पद्धत रूढ होणार आहे.घरोघरी महेश कुमार सारखे श्रावण बाळ तयार झाल्यास वृद्धाश्रम काढण्याची गरज पडणार नाही.

वैजनाथराव मेघमाळे यांच्याविषयी बोलताना मुंडकर म्हणाले की, बिलोली चा इतिहास मांडण्याची क्षमता ठेवणारा शांत ,संयमी आणि कृतज्ञ व्यक्तिमत्व म्हणजे वैजनाथराव होत. प्रसिद्ध कलावंत दिलीप खंडेराय यांनीही त्यांच्या योग आहार विहार या विषयी माहिती प्रगत केली. बिलोलीचे माजी उपाध्यक्ष मारुती पटाईत यांनी त्यांच्या कलागुणांना प्रकट करतानाच गीत गाऊन शुभेच्छा दिल्या. माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे यांनीही आपली प्रकृती मध्यम असताना खास या कार्यक्रमासाठी येऊन आपले मत प्रगट केले. प्रारंभी वैजनाथराव मेघमाळे यांचे नातू कु. परतवाड याचेही मनोगत झाले. कार्यक्रमाची प्रस्तावना नितींनकुमार जोड यांनी मांडली तर नेटके सूत्रसंचालन  महेशकुमार मेघमाळे यांनी केले. 

या कार्यक्रमाची  संकल्पना वैशाली, दिपाली,रुपाली, आणि महेश यांची होती.या कार्यक्रमास बिलोली शहरातील तुडमे, मेघमाळे, खंडेराय,अंकुशकर परिवार यासह शहरातील महिला पुरुष, युवक, युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी वैजनाथराव मेघमाळे आणि नरसिंगराव मेघमाळे यांना सौख्यदायी वैवाहिक जीवनाच्या सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी