सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक शाळेने आपली उज्वल यशाची परंपरा कायम -NNL


किनवट, माधव सूर्यवंशी|
दहावी परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून, या परीक्षेत यावर्षी सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक शाळेने आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या शाळेचा सेमीइंग्रजी चा निकाल 100% लागला आहे. तर मराठी माध्यमाचा 96 .88 % लागला आहे. 

गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी शाळेची गुणवत्ता वाढली असून 75 ते 100 % गुण प्राप्त करणाऱ्या  विद्यार्थ्यांची संख्या 84 एवढी आहे. रेजीतवाड अर्जुन बालाजी या विद्यार्थ्याने 97. 40 % गुण घेऊन प्रथम येण्याचा तर राठोड योगेश वसंत याने 96 . 40% घेऊन द्वितीय येण्याचा मान पटकाविला आहे. शाळेच्या गुणवत्तेबद्दल तसेच यशस्वी विद्यार्थ्यांबद्दल शाळेचे संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक यांच्याकडून अभिनंदन होत आहे.

शालांत परीक्षेचे निकाल घोषित झाले असून या परीक्षेत किनवट येथील सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या शाळेचा सेमी इंग्लिश चा निकाल 100% लागला आहे. तर मराठी माध्यमाच्या निकाल 96.38% एवढा लागला आहे. 90 ते100% गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 22 तर 80 ते 90 % गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 39 तर 75 ते 80 %गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 23 इतकी आहे. यावर्षी गुणवत्तेत शाळेने बाजी मारली असून 75 ते 100 टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यावर्षी वाढली आहे. यापैकी अर्जुन बालाजी रेजित वाड या विद्यार्थ्याने 97.40% गुण घेऊन प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. 

योगेश वसंत राठोड 96.40% गुण घेऊन द्वितीय तर सार्थक धनंजय देशपांडे या विद्यार्थ्याने 95 % गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला आहे. या शाळे बरोबरच मांडवा येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेने घवघवीत यश संपादन केले असून, या शाळेचा 92.30% निकाल लागला आहे. प्रतिक्षा अशोक साळवे हिने85 % गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान मिळविला तर अश्विनी कवडे 81 % घेऊन द्वितीय आली तर शिवराज माधव गीते या विद्यार्थ्याने 73 %गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे. दोन्ही शाळेच्या गुणवत्ता वाढीबद्दल तसेच विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार मुख्याध्यापक कृष्णकुमार नेम्मानीवार उपमुख्याध्यापक संजय चव्हाण मांडवाशाळेचे मुख्याध्यापक नरसिंग नेम्मानीवार शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

इयत्ता 10 वी परीक्षेचा किनवट तालुक्याचा  निकाल 96.48  टक्के ; 39 शाळांचा 100%  व 12 शाळांचा 95% च्या वर निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेचा किनवट तालुक्याचा  निकाल 96.48  टक्के लागला असून 39 शाळांचा निकाल 100 टक्के तर 12 शाळांचा निकाल 95% च्या वर आहे, अशी माहिती गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी दिली.

नोंदणी केलेल्या 3411 पैकी 3267 विद्यार्थी परिक्षेस बसले होते. त्यापैकी विशेष प्राविण्यासह 1324 , प्रथम श्रेणीत 1306 , व्दितीय श्रेणीत 477 व उत्तीर्ण श्रेणीत 45 असे एकूण 3152 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.100 % निकाल लागलेल्या शाळा : महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय घोटी, मातोश्री कमलताई ठमके विद्यालय सुभाषनगर किनवट, श्री बाबासाहेब मुखरे विद्यालय किनवट , सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालय किनवट , जिल्हा परिषद हायस्कूल शिवणी , शासकीय आश्रम शाळा पाटोदा (खु), शासकीय आश्रम शाळा जलधरा , राजा भगीरथ विद्यालय चिंचखेड , सरस विद्यालय उमरी ( बाजार) , शासकीय आश्रम शाळा सहस्त्रकुंड , हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कनकी , श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेली, शासकीय आश्रम शाळा जावरला, शासकीय आश्रम शाळा बोधडी (बु), सरस विद्यालय मांडवी, सरस विद्यालय (इंग्लिश मिडियम) मांडवी 

शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय निराळा तांडा , शासकीय आश्रम शाळा तलाईगुडा , संत भगवान बाबा माध्यमिक विद्यालय प्रधानसांगवी ,  बजरंग माध्यमिक विद्यालय पाटोदा (खु), रामचंद्र पाटील माध्यमिक विद्यालय परोटी तांडा, महात्मा गांधी विद्यालय अप्पारावपेठ, माणिक माध्यमिक विद्यालय चिखली (बु) स्व. संगीतादेवी हायस्कूल खंबाळा. स्व. नुरसिंग राठोड माध्यमिक विद्यालय लिंगी,  माणिक माध्यमिक विद्यालय तोटंबा, सुमन सुधाकर नाईक माध्यमिक निवासी आश्रम शाळा पळशी तांडा , संत फुलाजी बाबा आश्रम शाळा इस्लापूर , शासकीय आश्रम शाळा कुपटी (बु), शासकीय आश्रम शाळा किनवट, संत भगवान बाबा माध्यमिक विद्यालय सावरगाव तांडा, शिवबाबा अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा चिखली (खु), उत्तमराव राठोड आदर्श विद्यालय गोकुंदा, संत सखाराम महाराज माध्यमिक विद्यालय राजगड तांडा, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय गोकुंदा, श्री जेमला नाईक माध्यमिक विद्यालय भिशी, कै.प्रल्हाद गरुड माध्यमिक विद्यालय इस्लापूर , सेंट मेरी 'स इंग्लिश स्कूल गोकुंदा, अशोक पब्लिक स्कूल (इंग्लिश मिडियम) पळशी तांडा.

95 टक्केच्या वर निकाल असलेल्या शाळा (कंसात शाळेची टक्केवारी) : माध्यमिक विद्यालय कोठारी-चि (99.11), छत्रपती शिवाजी हायस्कूल बेल्लोरी-धानोरा (98.03) , महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा (97.90) , के एम पाटील माध्यमिक विद्यालय माळबोरगाव (97.72) , जिल्हा परिषद हायस्कूल मांडवी(97.43) , शिवाजी महाराज हायस्कूल कोपरा(97.14), जिल्हा परिषद हायस्कूल इस्लापूर (96.87), स.वि.मं. माध्यमिक शाळा किनवट (96.38) , अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा खेरडा (96.29) , प्रियदर्शनी माध्यमिक अनुदानित आश्रम शाळा उनकेश्वर (96) , जवाहेरुल उलूम उर्दू हायस्कूल किनवट(95.41), शासकीय आश्रम शाळा सारखणी (95)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी