ॲड. दिलीप ठाकूर हे नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी करत असलेली जनजागृती कौतुकास्पद- खा. प्रतापराव पा. चिखलीकर -NNL


नांदेड।
सतत वीस वर्ष चालण्याच्या स्पर्धा आयोजित करून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर हे नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी करत असलेली जनजागृती कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन स्पर्धेचे उद्घाटक खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.  दोनशे पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतल्यामुळे  चालण्याच्या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून विविध नऊ गटातील विजेत्यांना कच्छवेज गुरूकुल तर्फे मोबाईल बक्षीस म्हणून देण्यात आले.


भाजपा महानगर नांदेड, अमरनाथ यात्री संघ तसेच लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने गोवर्धनघाट येथील श्रीरामसेतु येथे दोन किमी अंतराच्या चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी यावेळी मार्गदर्शन करताना अमरनाथला जाणार्‍या यात्रेकरूंची प्रकृती उत्तम रहावी यासाठी चालण्याची स्पर्धा आयोजीत केल्याबद्दल  दिलीप ठाकूर यांचे कौतुक केले. 


स्पर्धेसाठी नांदेड भूषण सरदार नवनिहालसिंघ जहागीरदार,नांदेड भूषण ॲड. मिलिंद एकताटे, नांदेड भूषण डॉ. हंसराज वैद्य यांची विशेष उपस्थिती होती.वेगवेगळया  वयोगटामध्ये झालेल्या स्पर्धेत सुभाष देवकते, नीलिमा देशमुख, रेखा परदेशी, संजीवनी राठोड, माधव धुळगंडे, संजीव परदेशी, श्यामा मोरे यांनी प्रथम पारितोषिकासाठी ठेवलेले मोबाईल पटकावले .चुरशीच्या लढतीत मीनाक्षी नगनूरवार, शिवाजी वारकड,जयश्री उन्हाळे, सटवाजी नांदेडकर, वैशाली बाभणकर, विलास डांगे ,सारिका कोत्तावार, संध्या पोपशेटवार, संदीप साबळे, यांनी आपआपल्या गटात दुसरे बक्षिस मिळविले. 

अंजली सराफ,सुमित्रा टाकळीकर, सटवाजी नांदेडकर, दत्तात्रेय बारसे, अनुराधा कोटलू, अरविंद थोरात, संजीवनी राठोड, गौरव कंदकुर्ते, आदित्य कोत्तावार यांना तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. चालण्याच्या स्पर्धेची महती सर्व भारतभर करणाऱ्या माध्यम प्रतिनिधी साठी ठेवण्यात आलेल्या गटात संघरत्न पवार ,गोविंद पाटील व संजय गायकवाड यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक मिळवून दर्शकांची मने जिंकली . विजेत्यांना टेंट व मंगल कार्यालय असोशियनचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह परदेशी यांच्यातर्फे आकर्षक स्मृतीचिन्ह देण्यात आली. अ‍ॅड. चिरंजीलाल दागडीया व नीता दागडिया यांनी अमरनाथ यात्रेकरूंना चार महिने प्राणायाम करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 

डॉ. शैला कलंत्री, भाजपाचे उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी व बागड्या यादव, चिटणीस चंचलसिंग जट ,सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष परळीकर, मंडल अध्यक्ष आशिष नेरळकर व सूर्यकांत कदम, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संदीप छापरवाल, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनिल क्षिरसागर, प्रसिद्धीप्रमुख धीरज स्वामी, दिव्यांग आघाडी जिल्हा संयोजक प्रशांत पळसकर, पोलीस उपनिरीक्षक भोसिकर यांचा सत्कार बालासाहेब कच्छवे,डॉ.दीपकसिंह हजारी, ओंकार बंगरवार, शिवाजी मोरे ,दत्तात्रय कोळेकर, धोंडोपंत पोपशेठवार सुभाष शिंदे, बालाजी दावलबाजे, गंगाधर नगनुरवार, पांडुरंग चंबलवार धोंडीबा भाडेकर ,अशोक शिवनगावकर, जयश्री ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेचे पंच म्हणून अरुणकुमार काबरा, प्राचार्य आत्माराम पळणीटकर, सुधीर विष्णुपुरीकर, प्रा. नंदकुमार मेगदे, रामकृष्ण सोनटक्के यांनी चोख कामगिरी बजावली. 

संपूर्ण स्पर्धेचे धावते वर्णन दिलीप ठाकूर, प्रा. परकंटे, सुभाष भाले यांनी केल्यामुळे रंगत वाढली.भारती नेरलकर,संजीवनी वाघमारे, मेघा कोळेकर, मीनाक्षी नगनुरवार,  वर्षा बंगरवार, छाया पत्तेवार, प्रतिभा नेरळकर, उज्वला हळदेकर, प्रीती सोनटक्के ,मदनेश्वरी देवकते, सुमित्रा मेगदे ,संध्या विष्णुपुरीकर, अंजली पळणीटकर, सुलभा कापशीकर यांच्यासह अनेक महिला स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर, डॉ. शुभम कोळेकर,

संतोष भारती, राहुल बनसोडे, राजेश यादव,  सदाशिव कंधारे, प्रकाश कोत्तावार, धरमसिंह परदेशी, दीपक जोगदंड, प्रगती निलपत्रेवार, यांनी परिश्रम घेतले. अवघड असणारी अमरनाथ यात्रा सुलभ व्हावी यासाठी गेल्या वीस वर्षापासून सातत्याने प्रयत्न करीत असल्याबद्दल अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी