भोकर तालुक्यात वैरीणी मातेने दोन चिमुकल्याची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न-NNL

भोकर तालुक्यात येणाऱ्या मौजे पांडूरणा गावातील घटना


नांदेड/भोकर।
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात येणाऱ्या मौजे पांडूरणा गावात मातेच्या नावाला कलंक लावणारी घटना घडली आहे. एका निर्दयी मातेने स्वतःच्या चिमुकल्यांची हत्या करून भावाच्या सहकार्यानेच पुरावा नष्ट करण्याचा धक्कादायक प्रयत्न केल्याचा प्रकार उजेडात आला. या प्रकरणी भोकर पोलिसानी तिघां विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, या घाटेतील मुख्य आरोपी असलेली महिला धुरपताबाई गणपत निमलवाड, वय ३० ही पांडुरणा येथे शेतात पती आणि दोन वर्षाचा मुलगा व अवघ्या ४ महिन्याच्या मुलीसह राहत होती. घरातील सासु , सासरे व इतर दोघे दुसऱ्याच्या शेतात राहतात. धुरपताबाई निमलवाड हिने दिनांक ३१ मे २०२२ ते १ जून २०२२ रोजीच्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मुलगा दत्ता गणपत निमलवाड, वय २ वर्षे व मुलगी अनुसया गणपत निमलवाड, वय ४ महिने या दोघांची पांडुरणा शिवारात हत्या केली. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. 

उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी घटनास्थळी दाखल झाले.  पोलीस उपनिरीक्षक दिगांबर पाटील यांनी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. सदर हत्याकांडातील आरोपी आईस आणि तिला मदत करणाऱ्या तिच्या आई व भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास भोकर पोलीस करीत आहेत.

सदर घटना घडल्याच्या नंतर आरोपी महिलेची आई कोंडाबाई पांडुरंग राजेमोड व भाऊ माधव पांडुरंग राजेमोड ब्राम्हणवाडा तालुका मुदखेड जिल्हा नांदेड यांच्या मदतीने दोन्ही मयत चिमुकल्याचे प्रेत जाळून टाकून पुरावा नष्ट केला होता. क्रूर आरोपी मातेने आपल्या पोटच्या गोळयाची हत्या इतक्या निर्दयी पणाने का...? केली यांचे कारण समजू शकले नाही. 

सदर घटने प्रकरणी गावातीलच गोविंद दगडुजी निमलवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोकर पोलीस ठाण्यात महिला आरोपी धुरपताबाई गणपत निमलवाड, कोंडाबाई पांडुरंग राजेमोड, माधव पांडुरंग राजेमोड आदी तिघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिगंबर पाटील  करीत आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी